Tata Technologies IPO: 20 वर्षानंतर येतोय टाटांचा IPO, काय असेल प्राइस बँड?

Tata Technologies IPO: गुंतवणूकदार टाटा समूहाच्या आयपीओची आतुरतेने वाट पाहत आहेत.
Tata Technologies IPO
Tata Technologies IPOSakal

Tata Technologies IPO: जवळपास 20 वर्षानंतर टाटा समूहाची नवी कंपनी शेअर बाजारात उतरणार आहे. आता टाटा समूहाच्या टाटा टेक्नॉलॉजीजचा आयपीओ येणार आहे. टाटाच्या या आयपीओचे तपशील अद्याप आलेले नाहीत, परंतु ग्रे मार्केटमध्ये याची चर्चा आहे.

शेवटचा IPO 2004 मध्ये आला होता

टाटा समूहाच्या कंपनीचा शेवटचा आयपीओ 19 वर्षांपूर्वी आला होता. त्यावेळी 2004 साली TCS चा IPO आला होता. TCS च्या IPO ची देखील बाजारात प्रचंड चर्चा झाली होती आणि आता ती रिलायन्स इंडस्ट्रीज नंतर देशातील दुसरी सर्वात मोठी सूचीबद्ध कंपनी आहे. यामुळेच गुंतवणूकदार टाटा समूहाच्या नवीन आयपीओची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Tata Technologies IPO
ChatGPT बनवणारी कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर? दिवसाचा खर्चही झेपेना

महिनाभरात सुरू होण्याची अपेक्षा

टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड ही खरं तर टाटा ग्रुपची ऑटो कंपनी टाटा मोटर्सची उपकंपनी आहे. टाटा टेक्नॉलॉजीजच्या आयपीओला बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबीकडून आधीच मंजुरी मिळाली आहे.

टाटा टेक्नॉलॉजीचा आयपीओ ऑगस्टच्या शेवटी किंवा सप्टेंबरच्या सुरुवातीला येऊ शकतो. याचाच अर्थ पुढील एका महिन्यात टाटा समूहाचा नवा IPO बाजारात दाखल होऊ शकतो.

Tata Technologies IPO
MCLR Hike: RBI च्या रेपो दरात बदल नाही, मग का होत आहेत कर्जे महाग, काय आहे कारण?

IPO चे अंदाजे तपशील

Tata Technologies IPO मध्ये 405,668,530 शेअर्स असतील. कंपनीचे अंदाजे मूल्य 12,000 कोटी रुपये आहे, त्यामुळे असे मानले जाते की IPO ची इश्यू किंमत सुमारे 295 रुपये प्रति शेअर असू शकते. जर कंपनीने सूट दिली तर IPO किंमत 265-270 रुपयांच्या जवळपास राहू शकते.

सेबीने इश्यूचा प्रस्ताव मंजूर केला तेव्हापासून ग्रे मार्केटमध्ये टाटा टेक्नॉलॉजीजच्या आयपीओबद्दल चर्चा सुरू केली. आता IPO लॉन्च होण्याची संभाव्य तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतसा ग्रे मार्केटमधील प्रतिसादही वेगवान होत आहे.

सध्या Tata Technologies IPO चा ग्रे मार्केट प्रीमियम म्हणजेच GMP रु 105 वर पोहोचला आहे. आठवडाभरापूर्वी तो 89 रुपये होता.

Tata Technologies IPO
Billionaires List: अदानी आणि पुतिनसाठी खुशखबर! अब्जाधीशांच्या यादीत मिळाले स्थान, अंबानींची स्थिती काय?

आयपीओबाबत बाजारात उत्साह

जुलै महिन्यात, बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टीने अनेक वेळा नवीन उच्चांक पातळी गाठली आहे. आता टाटा समूहाच्या नव्या आयपीओबाबत बाजारात उत्साह आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com