Stock Market: 'या' भारतीय कंपनीने केला अनोखा विक्रम! शेअरहोल्डर्सची संख्या 50 लाखांच्या पुढे

50 लाखांहून अधिक शेअरहोल्डर्स असलेली पहिली भारतीय कंपनी ठरली आहे
Share Market
Share Market Esakal

Yes Bank Shareholders: येस बँकेने एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे. येस बँक ही 50 लाखांहून अधिक शेअरहोल्डर्स असलेली पहिली भारतीय कंपनी ठरली आहे. ही आकडेवारी मार्च महिन्यातील आकडेवारीनुसार आहे.

यानंतर टाटा पॉवर दुसऱ्या क्रमांकावर आहे. या कंपनीच्या एकूण शेअरहोल्डर्सची संख्या 38.5 लाख आहे. त्याचबरोबर या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीज तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्या शेअरहोल्डर्सची संख्या 33.6 लाख आहे.

येस बँकेच्या शेअरहोल्डर्सची संख्या 50 लाखांच्या पुढे :

डिसेंबर तिमाहीत येस बँकेच्या एकूण शेअरहोल्डर्सची संख्या 48.1 लाख होती, जी आता 50.6 लाख झाली आहे. येस बँकेचे सर्व शेअर्स सार्वजनिक आहेत. येस बँकेला बुडण्यापासून वाचवण्यासाठी 2020 मध्ये रिझर्व्ह बँकेने नवीन पुनर्रचना योजना तयार केली होती.

या अंतर्गत सर्व गुंतवणूकदारांना मार्च 2023 पर्यंत त्यांचे शेअर्स विकण्यास बंदी घालण्यात आली होती. मात्र हा लॉक-इन कालावधी 13 मार्च रोजी संपला. यानंतर शेअर्समध्ये सतत विक्रीचा कालावधी पाहायला मिळत आहे. (YES Bank first Indian company with over 50 lakh shareholders)

Share Market
Adani Dharavi Project: धारावीवर अदानींचा डोळा; कायापालट करण्यासाठी राजकीय पक्षांकडून दबाव

येस बँकेचे शेअर घसरले :

आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजे 13 एप्रिल 2023 रोजी येस बँकेच्या शेअर्समध्ये घसरण झाली. तो 0.97 टक्क्यांनी घसरून 15.25 रुपयांवर बंद झाला. दुसरीकडे, मागील महिन्यात कंपनीच्या शेअर्समध्ये 1.93 टक्क्यांची घसरण दिसून आली.

गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअर्सची सर्वोच्च पातळी 24.8 रुपये आहे. यासोबतच बँकेच्या शेअरने गेल्या वर्षभरात गुंतवणूकदारांना 8.16 टक्के परतावा दिला आहे.

एसबीआय येस बँकेतील मोठा शेअरहोल्डर :

येस बँकेला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी देशातील सर्वात मोठी सरकारी बँक SBI ने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

याशिवाय आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक, कोटक महिंद्रा बँक आणि एचडीएफसी यांनी येस बँकेत भांडवल गुंतवून संकटातून सावरले होते.

बेलआउट योजनेच्या नियमांनुसार, वित्तीय संस्थांनी तीन वर्षांसाठी एकूण खरेदी केलेल्या शेअर्सपैकी 75 टक्के भांडवल धारण करणे आवश्यक होते. किरकोळ गुंतवणूकदारांनाही हा नियम लागू होता.

Share Market
Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com