SEBI: 'झी'चा पाय पुन्हा गोत्यात! कंपनीमध्ये 2,000 कोटींची हेराफेरी; शेअर्समध्ये झाली मोठी घसरण

Zee Entertainment: SEBIने झी कंपनीमध्ये 240 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 2,000 कोटी) निधीची अनियमितता झाल्याचे उघड झाले आहे. ब्लूमबर्ग या वृत्तसंस्थेच्या हवाल्याने ही माहिती समोर आली आहे. अलीकडेच, या कंपनीचा सोनी सोबतचा विलीनीकरणाचा करार रद्द करण्यात आला आहे.
Zee shares crash 10 percent after Sebi finds 241 million dollar  accounting issue
Zee shares crash 10 percent after Sebi finds 241 million dollar accounting issue Sakal

Zee Entertainment Share Price: Zee Entertainment Enterprises (ZEEL)वरचे संकट आणखी गडद होत चालले आहे. आता SEBIने या कंपनीमध्ये 240 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 2,000 कोटी) निधीची अनियमितता झाल्याचे उघड केले आहे. ब्लूमबर्ग या वृत्तसंस्थेच्या हवाल्याने ही माहिती समोर आली आहे. अलीकडेच, या कंपनीचा सोनी सोबतचा विलीनीकरणाचा करार रद्द करण्यात आला आहे. (Zee shares crash 10 percent after Sebi finds 241 million dollar accounting issue)

ब्लूमबर्गमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, या प्रकरणाची माहिती असलेल्या लोकांनी सांगितले की, सेबीला झीच्या संस्थापकांच्या चौकशीत सुमारे 2,000 कोटी रुपयांचा गैरवापर झाल्याचे आढळले आहे. ही रक्कम सेबीच्या तपासकर्त्यांच्या आधीच्या अंदाजापेक्षा 10 पट जास्त आहे.

सेबी झीचे संस्थापक सुभाष चंद्रा, त्यांचा मुलगा पुनित गोयंका आणि काही बोर्ड सदस्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलावत आहे. झीच्या प्रवक्त्याने या प्रकरणावर भाष्य करण्यास नकार दिला आहे.

सेबीने ऑगस्टच्या एका आदेशात चंद्रा आणि गोयंका यांना त्यांच्या पदाचा गैरवापर आणि वैयक्तिक फायद्यासाठी निधीचा गैरवापर केल्याचे कारण देत कोणत्याही फर्ममध्ये सीईओ किंवा संचालक पदावर राहण्यास मनाई केली होती.

Zee shares crash 10 percent after Sebi finds 241 million dollar  accounting issue
Zee-Sony Merger : विलीनीकरण व्यवहाराबाबत ‘झी-सोनी’ची पुन्हा चर्चा सुरू

या अहवालानंतर बुधवारी कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांहून अधिक घसरले. गेल्या 1 वर्षात झी एंटरटेनमेंटचे शेअर्स 30 टक्क्यांपेक्षा जास्त घसरले आहेत. सोनी ग्रुप कॉर्पच्या इंडिया युनिटमधील विलीनीकरणाचा करार संपल्यानंतर अलीकडेच झी एंटरटेनमेंटच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. झी एंटरटेनमेंटचे शेअर्स वार्षिक आधारावर 30 टक्क्यांहून अधिक घसरले आहेत.

कंपनीच्या शेअर्समध्ये गेल्या सहा महिन्यांत 36.11 टक्क्यांनी घसरण झाली आहे. झी एंटरटेनमेंटचे शेअर्स सकाळी 10:34 वाजता 10.52 टक्क्यांनी किंवा 20.30 रुपयांनी 172.70 रुपयांवर घसरले.

Zee shares crash 10 percent after Sebi finds 241 million dollar  accounting issue
EPFO: देशात नोकऱ्यांमध्ये झाली वाढ; 15 लाखांहून अधिक सदस्यांचा EPFOमध्ये समावेश, कोणते राज्य आघाडीवर?

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com