

The Rise of 'Cockroach Janata Party' and Political Dissent
Sakal
माझ्या तमाम झुरळजनहो!,’’ विश्वझुरळ पक्षाचा प्रमुख नेता तैलपवीर, तलवार-ए-तिलबट्टा झुंजार झिंगूरकर बुलंद आवाजात गरजला. त्याच्या दोन्ही मिश्या दुधारी तलवारीसारख्या तळपत होत्या. समोर अफाट झुरळसमुदाय उपस्थित होता. कुठल्या कुठल्या सांदीसपाटीतून, नाले-गोदामातून झुरळजन सभेसाठी आले होते. पहावे तेथे जणू चाकलेटी सागर पसरलेला होता. काही रोमांटिक जनांना तो मेलडी चाकलेटांचा ढिगारा वाटला. पण तसे नव्हते. तथापि, झुरळ स्वातंत्र्याचा तो हुंकार कोणीही ऐकला नाही, कां की झुरळांना आवाजच नसतो. झुरळांच्या या नि:शब्द क्रांतीने जणू विश्वाला हादरे बसले. वातावरण भारलेले होते...