

British Nandy uses sharp political satire and numerology to deliver a humorous take on contemporary political narratives.
Sakal
भारतीय संस्कृतीचा धांडोळा घेता गेल्यास आठाच्या आकड्याचे महत्त्व सहजी ध्यानी येते. अष्टविनायक, अष्टलक्ष्मी, अष्टदिशा, अष्टधातू...यावरून अष्टाचे महत्त्व स्पष्ट होते. अष्ट इज ऑलवेज बेष्ट असे म्हणतात ते उगाच नाही. आठाची जादूच अशी आहे. बालपणी आमची गणिताची बाजू अंमळ लंगडी होती. असे असले तरी आम्ही पुढे अंकशास्त्रात बहु प्रगती केली. समोर आकडा आला की आम्ही चेकाळतो. अचूक आकडा सांगून आम्ही अनेकांना भाग्यवान केले आहे. आमच्या घरासमोर दररोज अनेक मोटारी लागलेल्या असतात. त्या या भाग्यवंतांच्याच असतात. कां की त्यांना रोज आकडा हवा असतो. आम्ही तो लीलया काढून देतो. अर्थात सदरील भाग्यवंताचा मूलांक किंवा शुभांक काढल्याशिवाय ही विद्या फळत नाही. आधी तुमची जन्मतारीख सांगा, मगच आम्ही तुम्हाला आकडा सांगू.