

Dhing Tang: A satirical take on rising tea prices, inflation and the changing culture around roadside tea stalls.
Sakal
सर्वप्रथम हे सांगितले पाहिजे की चहा वाईट! त्याने माणसाचे नव्हे तर समाजाचेच आम्लपित्त वाढते. आम्लपित्त वाढ वाढ वाढले की प्रकरण अल्सरवर जाते. चहामुळे होणारे सामाजिक आम्लपित्त हा (आता) जुनाट आजार झाला आहे. कुठल्यातरी गुजराथेतील कुग्रामात रेल्वे स्थानकावर चहा विकल्यामुळे देशाची धुरा हाती आलेल्या एक दिग्गज व्यक्तीमुळे समाजाचे आम्लपित्त (चहा न पिताच) इतके वाढले. चहावालाही विश्वगुरू होऊ शकतो, हे कसे काय शक्य झाले? हा सध्याचा ज्वलंत सवाल आहे.