ढिंग टांग : मराठी पाशिंग टेस्ट...!

रिक्षा-टॅक्सीवाल्यांसाठी मराठी पाशिंग अनिवार्य; लाखो चालकांनी परीक्षा दिली, हजारो फेल झालेल्यांसाठी कोचिंग क्लासची तयारी
The Marathi Passing Test! A humorous take on the new Marathi language test for auto-rickshaw and taxi drivers, with British Nandy’s signature satire and wit.

The Marathi Passing Test! A humorous take on the new Marathi language test for auto-rickshaw and taxi drivers, with British Nandy’s signature satire and wit.

Sakal

Updated on

आता गाडी पाशिंगबरोबर मराठी पाशिंग पण अनिवार्य करण्यात आले आहे. ज्या परप्रांतीय व प्रांतीय रिक्षावाल्यास पाशिंगपुरतेही मराठी येत नाही, त्यांचे लायसन-बॅज क्यान्सल होणार आहे. गेल्या काही दिवसांत एक लाख सत्तर हज्जार रिक्षा-टॅक्सीवाल्यांनी आर्टीओची मराठी परीक्षा दिली. त्यापैकी एक लाख चाळीस हज्जारांनी मराठी पाशिंग केली. साडेचौदा हजारांची अजून परीक्षा बाकी आहे, आणि सात हजार सातसो पच्यास रिक्षावाले फेल झाले!! फेल म्हंजे एकदम इंजिन फेल!! दांडू वढून वढून खांदे निखळले, पण मराठीची गाडी चालूच हुईना. या साडेसात हज्जार रिक्षावाल्यांना पुन्हा मराठी पाशिंग परीक्षा द्यावी लागणार असून त्यांच्यासाठी आम्ही कोचिंग क्लास चालू करणार आहोत. काळजी नसावी.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com