

Satirical Sparks: The Hilarious Political Banter of Mamma Madam and Beta
Sakal
बेटा : (आक्रमक एण्ट्री घेत) ढॅणटढॅऽऽण...मम्मा, आयॅम बॅक!
मम्मामॅडम : (पक्षकार्यात पूर्णपणे मग्न...) हं!
बेटा : (घुश्शात) मम्मा, आयॅम टेलिंग यु...आपला देश डब्यात चाललाय!
मम्मामॅडम : (कामाच्या तंद्रीत) डबा कशाला हवाय?
बेटा : (सर्द होत्साता) मला डबा नकोय! माझ्या बोलण्याकडे लक्ष दे जरा! आपला देश डब्यात...आय मीन, खड्ड्यात चाललाय, खड्ड्यात!
मम्मामॅडम : (सुस्कारा सोडत) तो तर गेली बारा वर्ष खड्ड्यात चाललाय! त्यात काय नवीन?