

Shaikh Hasina
esakal
बांगलादेशातील असंतोषाची आग भडकती ठेवण्यासाठी बाह्य शक्तींनी त्यात तेल ओतले, हे लपून राहिलेले नाही.
सत्ता बदलली की शब्दांचे अर्थ, संदर्भ पार बदलून जातात. बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना तेथील ‘आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधीकरणा’ने मृत्युदंडाची शिक्षा सुनावल्यानंतर हंगामी सरकारचे प्रमुख महम्मद युनूस व त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘न्यायाची बूज राखली गेली’, असे सांगायला सुरुवात केली आहे.