

Emergency responders at the spot where a man collapsed during intense sit-up exercises; authorities investigating the cause.
Sakal
नवे तंत्रज्ञान, बदलती आव्हाने, कल्पकता आणि नवनिर्मितीला आलेले महत्त्व या आणि अशा अनेक कारणांमुळे अवघे जगच आता मुक्त ज्ञानव्यवस्थेच्या दिशेने वाटचाल करू लागले आहे. डोक्यावरील माहितीच्या ओझ्यापेक्षा आकलन आणि विश्लेषण प्रभावी ठरताना दिसते. खरेतर या दोन्ही क्षमतांचा पाया घातला जातो तो प्राथमिक पातळीवर अन् त्याची मूलतत्त्वे ही आनंदी शिक्षणामध्ये दडलेली आहेत. ताणविरहित अशा खेळीमेळीच्या वातावरणात मिळणारे शिक्षणाचे धडे मुलांच्या आयुष्याला आकार तर देतातच; पण त्यातून त्यांच्यातील समाजाप्रतीचा ऋणानुबंध अधिक घट्ट होतो. याची जाणीव नसलेल्या आणि ‘छडी लागे छमछम’च्या नवनव्या आवृत्त्या काढण्यात मग्न असलेल्या व्यक्ती जर ‘प्राथमिक’ अक्षरे गिरवू लागलेल्या मुलांच्या नशिबी येत असतील तर कसे अनर्थ घडू शकतात, याची जळजळीत जाणीव वसईतील दुर्घटनेने करून दिली आहे.