आर्थिक उदारीकरणाच्या प्रक्रियेला पूर्णविराम देण्यासाठी अमेरिकेसारख्या महाशक्तीचे अध्यक्ष या नात्याने ट्रम्प सरसावले असल्याचे स्पष्ट झाले.
सार्वजनिक जीवनात औचित्यविचाराला महत्त्व असते. निदान आत्तापर्यंत तसा समज होता. पण जागतिक महासत्तेच्या सध्याच्या प्रमुखांना ते मान्य नाही, असे दिसते, हे यापूर्वीही अनेकदा दिसले. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेतील भाषणही त्याला अपवाद नव्हते.