gateway of india
sakal
भारत व ब्रिटन यांच्यात मुंबईत झालेली सहमती उभय देशांचे अनेक शतकांचे संबंध नव्याने दृढ करणारी ठरेल.
मुंबईविषयी ब्रिटिशांचे आकर्षण ऐतिहासिक, आर्थिक आणि प्रतिकात्मक आहे. समुद्रातील बेटांना एकत्र करुन इंग्रजांनी बंदरे, रस्ते, रेल्वे, पाणीपुरवठा आणि नगररचनेतून मुंबईला ब्रिटिश साम्राज्यातील ‘ज्युएल इन द क्राउन’ बनवली. भारताचे प्रवेशद्वार ठरलेले ‘गेटवे ऑफ इंडिया’ म्हणजे शंभर वर्षांपूर्वी ब्रिटिश साम्राज्याची सत्ता, सामर्थ्य आणि संपत्तीचे प्रतीक.