राजनैतिक पातळीवर भारताने काही पावले उचलून पाकिस्तानला इशारा दिल्यानंतर पाकिस्तानचा प्रतिसाद हे कोडगेपणाचेच लक्षण.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यासाठी जबाबदार ठरवून पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी पाच निर्णयांचे अस्त्र उगारत भारताने सिंधू जलवाटप करार स्थगित केला आहे. दोन्ही देशांच्या संबंधांतील कोरडेपणा यापूर्वीच स्पष्ट झाला आहे. कोडगेपणाची परिसीमा गाठलेला पाकिस्तान अशा कठोर वाटणाऱ्या मुत्सद्देगिरीच्या मार्गानेही वठणीवर येणार नाही.