राज्याच्या राजकारणाचे सध्याचे स्वरूप आशयविहीन आणि पोकळ होत चालले आहे. त्याचेच प्रतिबिंब मुंबईतील शिवसेनेच्या दोन गटांच्या दोन मेळाव्यात दिसले.
मराठी माणसाच्या भल्यासाठी ५९ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या शिवसेना नावाच्या कडवट संघटनेची आता दोन शकले झाली आहेत. त्याचीही आता मराठी मतदारांना सवय होते आहे. पुढल्या वर्षी ही संघटना साठीत शिरेल. पण साठीच्या उंबरठ्यावर आलेल्या या संघटनेची भाषा मात्र तीच आणि तशीच राहिली आहे.