

The latest Dhing Tang column humorously blends New Zealand, Maori culture and a famous muffler with political satire.
Sakal
काही जणांच्या पायावर चक्रे असतात. मी लहानपणी माझा पाय एका पदसामुद्रिकाला दाखवला होता. (हस्तसामुद्रिक असते, तसे पदसामुद्रिकही का नसावे?) त्याने माझा पाय (लांबून) बघितला. म्हणाला, ‘‘जातक चिक्कार फिरणार, पायाला भिंगरी लागल्यागत फिरणार, जातकाच्या पायावर चक्रेच चक्रे आहेत..जय हो!’’
तेव्हापासून मी नुसता फिरतो आहे! पर्यायच नव्हता. मग मी झोला उचलला आणि बारा वर्षे हिमालयात फिरलो. लगेहाथ भारतभ्रमणही केले. तेव्हापासून आजतागायत शेकडो देश फिरलो आहे. या जगात १९५ देश आहेत, असे मला सांगण्यात आले. मी सगळे हिंडणार आहे. बाकीचे देश हिंडून होईपर्यंत आणखी चार-सहा देश नवे निर्माण होतील, तेही बघून घेईन. मग माझे पर्यटनाचे द्विशतक होईल. मज्जा!