esakal | ढिंग टांग : तपास! 
sakal

बोलून बातमी शोधा

ढिंग टांग : तपास! 

माय डिअर नमो, तुमची आणि शी जिनपिंग यांची चांगली मैत्री आहे ना? तुम्ही त्यांच्याबरोबर झोपाळ्यावर बसून झोके घेत गप्पा मारल्याचे मला आठवते. तुम्ही तुमचा वशिला वापरून चिनी प्रयोगशाळेत शिरकाव साधाल का? 

ढिंग टांग : तपास! 

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

डिअर फ्रेंड नमो, हाऊझ यु! सर्वप्रथम मेनी थॅंक्‍स फॉर हायड्रॉक्‍सी क्‍लोरोक्‍विन!! भारतात आलो होतो तेव्हा मला तुम्ही खूप चॉकलेटे दिली होती. इंडियन चौकोलेट्‌स! ती फार खाल्ल्याने मला जंत होतील, अशी भीती आमच्या यूएसच्या सर्जन जनरलने व्यक्‍त केली, म्हणून पुढे खाल्ली नाहीत. अजूनही शिल्लक आहेत! असो. पण तेव्हा झाला होता, त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक आनंद क्‍लोरोक्‍विनच्या गोळ्यांनी झाला! आता त्यांची बरणी भरून ठेवली आहे, पण जपून खाणार आहे! काळजी नसावी. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पत्र वेगळ्याच कारणासाठी लिहीत आहे. गोपनीय राहावे, यासाठी तुमच्याच भारतातल्या मराठी नावाच्या भाषेत लिहीत आहे. हे गुप्त पत्र एका सीआयएच्या एजंटमार्फत धाडत आहे. तो थेट तुमच्या घरी येईल. त्याने मास्क लावलेला असेल. परवलीचे वाक्‍य म्हणून तो "जान है, तो जहान है' असे म्हणेल! त्यावर तुम्ही "जान भी है, और जहान भी है' असे म्हणायचे. मगच तो हे पत्र तुमच्या हाती देईल. पत्र मिळताच (पुन्हा एकदा) मेणबत्ती पेटवावी. त्या मेणबत्तीच्या प्रकाशात पत्र वाचावे. मग वाचून झाल्यावर (मेणबत्तीवरच) जाळून टाकावे किंवा सॅनिटायझर फवारून गिळून टाकावे!!.. 

मला एक टेरिफिक प्लान सुचला आहे. तो असा : 

सध्या वैतागवाडी ठरलेली ही कोरोनाची भानगड चीनमध्ये सुरू झाली, हे उघड आहे. चीनमधल्या वुहानमध्ये एक प्रयोगशाळा आहे, तिथे हा विषाणू जन्माला आला आणि नंतर बाहेर सटकला, असे मला आमच्या खुफिया एजंटांनी सांगितले. या प्रयोगशाळेत (जेम्स बॉंडसारखे) गपचूप शिरून सत्य काय ते हुडकावे, असे मनात आहे. पण तिथे पोचणार कसे? 

चिनी राष्ट्रप्रमुख शी जिनपिंग यांना मी कार्ड टाकून "आमच्या लोकांना तुमची प्रयोगशाळा तपासण्याची परवानगी द्या' असे सांगितले होते. त्यांनी उलट टपाली 'नानाची तांग' असे कळवले. शिवाय काही चित्रविचित्र आकार काढून पाठवले आहेत. ही चिनी चित्रलिपी असून नानाची तांग नावाचा कोणी चिनी शास्त्रज्ञ असावा, त्याची भेट घ्यावी, असा जिनपिंग यांच्या पत्राचा मसुदा असेल असे वाटते. इथे चिनी भाषा कोणाला येते? आमच्या सीआयएचे लोक नानाची तांगचा शोध घेत आहेत. लागला की कळवेन! 

माय डिअर नमो, तुमची आणि शी जिनपिंग यांची चांगली मैत्री आहे ना? तुम्ही त्यांच्याबरोबर झोपाळ्यावर बसून झोके घेत गप्पा मारल्याचे मला आठवते. तुम्ही तुमचा वशिला वापरून चिनी प्रयोगशाळेत शिरकाव साधाल का? तिथेच या विषाणूचा जन्म झाला होता, एवढे कळले तरी खूप झाले. पुढचे सारे मी बघून घेईन!! कळावे. 

तुमचाच लाडका मित्र. ट्रम्प (तात्या) 

* * * 
माय डिअरम डिअर डोलांडभाई! जे श्री क्रष्ण. हौडी!! क्‍लोरोक्‍विनच्या टेब्लेट भेटला ने? हा चोक्‍कस काम झ्याला. हवे कोरोनाना काई डर नथी!! जान भी है, और जहां भी है!! सांभळ्यो? 

शीभाईशी माझ्या बोलणां झ्याला. त्याला फोन करून "केम छो' असे विचारले. त्यांनी "वो हेन हाऽऽव...छीछी!' असे म्हटले. जवां दे! आपडा शुं छे? 

वुहानमधी सगळा एकदम चोक्‍कस हाय, असा शीभाईने सांगितला. ते खरेखर खराच असेल, असा मने तो गमे छे! तमे जेम्स बोंडगिरी करवानी आयडिया ना करजो! अंगलट आवीश!! (आ मराठी-गुजराथी लेंग्वेज छे!) आवजो! 

तमारा मित्र नमो. 

ता. क. : नानाची टांग एटले नानाभाईना पग!! सांभळ्यो? आवजो!