esakal | ढिंग टांग : फ्रॉम रशिया विथ लव्ह!
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing-Tang

‘प्रिव्येत डॉ. पुतीन !,’’ आम्ही अघळपघळपणे विचारले. डॉ. पुतीन यांनी प्रश्नार्थक चेहऱ्याने आमच्याकडे बघितले. वास्तविक डॉ. पुतीन यांच्याशी आमची पहिल्यापासून चांगली वळख आहे. 

‘काका देला?’ आम्ही रशियन भाषेत ‘हौवार्यु’ म्हटले. डॉ. पुतीन यांनी चेहरा आणखी खडूस केला. खडूस चेहऱ्यांची आम्हाला सवय आहे. परवा आम्ही ‘कोरोना लशीचे कुठवर आले हो?’ असे डायरेक्‍ट श्रीनमोजी यांनाच विचारले, तेव्हा त्यांनी खडूस चेहरा करून ‘मास्क लावा, दूर रहा, हात धुवा’ असे दर्डावून सांगितले. चालायचेच.

ढिंग टांग : फ्रॉम रशिया विथ लव्ह!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

‘प्रिव्येत डॉ. पुतीन !,’’ आम्ही अघळपघळपणे विचारले. डॉ. पुतीन यांनी प्रश्नार्थक चेहऱ्याने आमच्याकडे बघितले. वास्तविक डॉ. पुतीन यांच्याशी आमची पहिल्यापासून चांगली वळख आहे. 

‘काका देला?’ आम्ही रशियन भाषेत ‘हौवार्यु’ म्हटले. डॉ. पुतीन यांनी चेहरा आणखी खडूस केला. खडूस चेहऱ्यांची आम्हाला सवय आहे. परवा आम्ही ‘कोरोना लशीचे कुठवर आले हो?’ असे डायरेक्‍ट श्रीनमोजी यांनाच विचारले, तेव्हा त्यांनी खडूस चेहरा करून ‘मास्क लावा, दूर रहा, हात धुवा’ असे दर्डावून सांगितले. चालायचेच.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वाचकहो, जरा कान इकडे करा! तुम्हाला म्हणून सांगतो, रशियाच्या डॉ. पुतीन यांनी सगळ्या जगाच्या नाकावर टिच्चून कोरोनाची लस शोधून काढली आहे. नाही म्हटले तरी हा गृहस्थ आता थोडा भाव खाणारच. 

‘तुम्ही लस शोधून काढलीतच शेवटी अं? लब्बाड!,’’ आम्हाला खरे तर त्यांचा गालगुच्चा घेऊन हे वाक्‍य म्हणायचे होते. पण नाही घेतलान. कशाला उगाच? रागवायचे. असो. 

कोरोनाचा नायनाट करणारी लस त्यांनी शोधून काढल्याचे सर्वप्रथम कळले ते आम्हालाच. या लशीचा शोध रशियातच सर्वात आधी लागणार, हे आम्हाला माहीत होते. अंतराळात सर्वात आधी यान पाठवणाऱ्या या देशातच कोरोनाची लस गावणार, हे ओळखायला भविष्यवाला कशाला पाहिजे?

‘पण तुम्ही लोकं विश्वास ठेवाल तर ना?’’ थोडेसे चिडून डॉ. पुतीन म्हणाले. आम्हाला रशियन भाषा येते, तशीच डॉ. पुतीन यांना मराठी चांगली येते. कोरोनाची लस शोधून काढणाऱ्या माणसाला मराठी भाषा येणारच की!!
‘‘व्वा! असं कसं म्हंटा? आम्ही रशियाचे मित्र आहो बरं का...पहिल्यापासून!’’ आम्ही आंतरराष्ट्रीय संबंधांची आठवण  त्यांना करून दिली. ‘मेरा जूता है जापानी, ये पतलून इंग्लिस्तानी, सर पे लाल टोपी रुसी, फिर भी दिल है हिंदुस्तानी’ हे गाणेदेखील (सानुनासिक) म्हणून दाखवले. 

भारत हाच रशियाचा बालमित्र असून या प्राचीन दोस्तान्याचा लिहाज पुतीनसाहेबांनी ठेवावा, एवढेच आमचे म्हणणे होते. आमच्या भावनिक आवाहनामुळे (किंवा गाण्यामुळे) डॉ. पुतीन जेरीस आल्यासारखे वाटले खरे, पण आम्ही हेका सोडला नाही.

लशीचे नामकरण काय केले? असा प्रश्न विचारण्यासाठी आम्ही रशियन भाषेत जुळवाजुळव करत होतो. तेवढ्यात डॉ. पुतीन उद्गारले : ‘‘स्पुटनिक पाच! स्पुटनिक पाच!!’’
आँ? हे लशीचे नाव आहे की काय? अमेरिकेच्या नाकावर टिच्चून रशियाने साठ वर्षांपूर्वी साठमध्ये अवकाशात सोडलेल्या उपग्रहाचे नाव ‘स्पुटनिक पाच’ असेच होते ना?
‘‘व्वा! पुतीनसाहेब, तुस्सी ग्रेट हो!’’ आम्ही दाद दिली.
‘‘दंडावर घेता, की...? ’’ डॉ. पुतीन यांनी हातात दाभणसदृश भलेदांडगे इंजेक्‍शन परजत खडूस चेहऱ्याने विचारणा केली. आम्ही प्राणांतिक दचकलो. तोंडातून शब्द फुटेना!

शेवटी धीर करून विचारले :‘‘स्पुटनिक अवकाशात सोडलेत तेव्हा आधी ‘लायका’ की ‘बेल्का’ नावाची कुत्री सोडली होती ना? की थेट माणूस?’’ 
...एवढे बोलून ‘पाका पाका’ (बाय बाय) असे ओरडत आम्ही तेथून काढता पाय घेतला.

Edited By - Prashant Patil