dhing tang
sakal
सदू : (फोनमध्ये विचित्र आवाज काढत) खर्रर्रक…खीक खीक…खर्रर्रक…खीक खीक…!
दादू : (फोन उचलून संशयाने) कोण बोलतंय? हे असले खाकरे काढल्यासारखे विचित्र आवाज काढून निनावी फोन कोण करतंय? खांडोळी करीन!!
सदू : (वरमून) अरे, दादूराया, रागावू नकोस…मीच बोलतोय, तुझा धाकटा भाऊ, सदू!!
दादू : (राग निवळत) तू होय! मला वाटलं कमळ पार्टीतला कोणीतरी चहाटळपणा करतोय! ते हल्ली फार त्रास देतात!!