ढिंग टांग - बाबाजी वेंगा यांची भविष्यवाणी…!

कराडच्या बाबाजी वेंगा यांच्या भन्नाट भविष्यवाणीने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मराठी पंतप्रधान येणार, या त्यांच्या विनोदी भाकिताने दिल्लीपासून नागपूरपर्यंत चर्चा रंगल्या आहेत.
Karad’s Babaji Venga’s hilarious prophecy about a Marathi Prime Minister creates political tremors.

Karad’s Babaji Venga’s hilarious prophecy about a Marathi Prime Minister creates political tremors.

Sakal

Updated on

कराडचे बाबाजी वेंगा यांची भविष्यवाणी आजपर्यंत चुकलेली नाही. एकवेळ विधिलिखित फेक नॅरेटिव ठरेल, पण बाबाजी वेंगा यांच्या मुखातून शब्द गेला की गेला!! बाबाजी वेंगा यांना कोण ओळखत नाही? अंहं!! बल्गेरियाच्या बाबा वेंगा आणि आपले बाबाजी वेंगा यांची गल्लत करु नका. बल्गेरियन बाबा वेंगा हीस दिव्य दृष्टी प्राप्त होती, पण तीस अंधत्व होते. बाबाजी वेंगा हे डोळस भविष्यवेत्ते असून ते कराडला राहतात, (आणि आपण दिल्लीत कां नाही, या दु:खात चूर असतात.) या दु:खवेदनेला अंतर देण्यासाठीच त्यांनी फावल्या (म्हंजे सगळ्याच) वेळात भविष्यविद्येचा सांगोपांग अभ्यास केला. रोज पहाटे उठावे आणि कृष्णा-कोयनेच्या संगमावर बसून भविष्यविषयक ग्रंथांचे आलोडन करावे, असे त्यांनी ठरवले. यातील पहाटे उठण्याचे कलम काही जमले नाही, संगमावरही रोज जाऊन बसणे जिकिरीचे होते. शेवटी घरच्या घरीच लोडाला टेकून त्यांनी भविष्यविद्येचे आलोडन करण्याचा सपाटा लावला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com