dhing tang
sakal
मन भरून आलेले आहे. भरून येण्याआधी ते उचंबळून आले होतेच. त्यात ते भरून आले. अशा वेळी फार पंचाईत होते. आमची ही अवस्था झाली ती मुंबईत उभ्या राहणाऱ्या आमच्या लाडक्या पक्षाच्या प्रदेश कार्यालयाच्या भूमिपूजनामुळे. तिथे कुदळ पडली, आणि इथे आमच्या मनाचे कारंजे उडाले!