

The Ongoing Battle of Bombay vs Mumbai
Sakal
सांप्रतकाळी बॉम्बेचे मुंबई कोणी केले, यावरुन श्रेय-अपश्रेयाची लढाई सुरु आहे, ती पाहून आम्हाला वाईट वाटते. जम्मूस्थित जीतेंद्र सिंह नामे कुण्या दिल्लीकराने मध्यंतरी मुंबईत येऊन ‘आयआयटी बॉम्बे’ हेच नाव योग्य अशी उगाचच मल्लिनाथी केली. त्यामुळे मुंबईतील मराठी अस्मितेची जखम चिघळली. त्या चिघळलेल्या जखमेमुळे नवाच वाद निर्माण झाला. मुंबई नावाबद्दल आग्रही असलेल्या मुंबईवादी मराठीजनांच्या तारणहार नेत्यांनी आपल्या मुलांची शिक्षणे ‘बॉम्बे स्कॉटिश शाळेत’ केली, ‘तेव्हा कोठे गेला होता राधासुता तुझा धर्म?’ ऐसा सवाल बॉम्बेवादी करु लागले. ‘मुंबई आधी की बॉम्बे?’ अशी ऐतिहासिक मांडणी होऊ लागली. आम्ही हे प्रकरण मुळातून तपासण्याचे ठरवले. त्यातून आमच्या हाती लागलेली माहिती भयंकर म्हणजे भयंकर स्फोटक आहे.