dhing tang
sakal
दसरा उजाडला. मोरुचा बाप मोरुला म्हणाला, ‘अरे मेल्या, मोऱ्या, दसरा उजाडला, तू अजून अंथरुणात घोरताहेस. किती रे हा मस्तवालपणा! सणासुदीला असे पासलें पडू नयें, त्याने दळिद्र येते.’
उत्तरादाखल मोरुने घोरण्याच्या लयीत अंमळ बदल केला, आणि न्यम न्यम न्यम ऐसा आवाज काढून झोपेतच मिटक्या मारल्या.