ढिंग टांग : पोपट जिंदा है...!

ding dang maharashtra politics devendra fadanvis sanjay raut rahul narvekar
ding dang maharashtra politics devendra fadanvis sanjay raut rahul narvekarsakal

रा.  श्री. पोपटराव हिरवे (मविआचा पोपट) यांसी, स. न. फारा दिवसात गाठभेट नाही. हल्ली तुमची प्रकृती बरी नसते, असे कळले म्हणून हा पत्रप्रपंच. दहा महिन्यांपूर्वीच तुमच्याविषयी उलटेसुलटे कानावर आले होते.

मविआचा पोपट मेला असे कोणीतरी सांगितले, आणि धक्काच बसला. ‘तुम्ही आहात, पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे घरीच आहात’ हे मागाहून कळले. राजकीय पोपटाचे हे असेच असते. अनेक वावड्या सतत उठत असतात. लोक आपल्या मरणावरच टपलेले असतात. चालायचेच. कावळ्याच्या शापांनी पोपट मरत नाहीत!!

महाविकास आघाडीचा पोपट मेला आहे, असे परवा मला कुणीतरी सांगितले. मी मुळीच विश्वास ठेवला नाही. तुम्ही इतक्यात ‘जाणार’ नाही याची खात्रीच आहे. तुम्हीही जाणार नाही, आणि मीही जाणार नाही! (देखते रहना!) मागल्या खेपेला मी मेलो अशी आवई उठली होती, पण फिनिक्स पक्ष्याप्रमाणे मी पुन्हा आलो!!

ding dang maharashtra politics devendra fadanvis sanjay raut rahul narvekar
Maharashtra Politics: 'संजय राऊत शरद पवारांची पायपुसणी तर उध्दव ठाकरे...', शिवसेनेच्या नेत्याचा सणसणीत टोला

राजकारणात बरेच पोपट असतात. त्यातले काही खरोखर मरतात. पण पोपटाने पंख पसरलेत, चोच वासली आहे, पाय ताणले आहेत, वगैरे वर्णने होतात, पण पोपट मेला आहे, हे जाहीर करणे शक्य होत नाही. हेदेखील चालायचेच. भारतीय मतदारांच्या आता हे अंगवळणी पडले आहे. सध्या माझे बरे चालू आहे. खोक्यातून फळे येत आहेत. रोज आंबे!! तुम्ही तुमची खुशाली उलट टपाली कळवा, शेवटी काही झाले तरी तुम्ही आमचेच भाईबंद आहात! कळावे. आपला. पोपटराव चोचे (कर्मवीर गट)

ding dang maharashtra politics devendra fadanvis sanjay raut rahul narvekar
Politics: महेश लांडगेंच्या मागणीवर चंद्रकांत पाटलांची मिश्किल टिप्पणी; म्हणाले, मुंबईचा समु्द्र...

पोपट चोचे (कर्मवीर गट) यास, किर्रर्रर्र!! मी मेलेलो नाही, मरणारही नाही, तुमचे बारसे जेवलो आहे, तुम्हाला पोचवून बाराव्याचे जेवूनच जाईन, याची खात्री असू द्यावी. महाविकास आघाडीचा पोपट आहे मी! उसन्या अवसानावर जगत नाही, तुमच्यासारखा!! पोपट्या, तुझे पत्र हेच गलिच्छ राजकारण आहे, हे मी ओळखून आहे. माझ्या श्रद्धांजलीच्या सभा घेण्याची तुम्हाला घाई झाली आहे, पण तुमचा हिरमोड होणार आहे, हे बरे जाणून असा!!...आईग्गं, किर्रर्र!

ding dang maharashtra politics devendra fadanvis sanjay raut rahul narvekar
Maharashtra Politics : अपात्रतेबाबत लवकर निर्णय घ्या; ठाकरे गटाची विधानसभा उपाध्यक्षांकडे मागणी

दहा महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. पिंजऱ्यातील दांडीवर बसून मजेत हेलकावे खात असताना मला कुणीतरी धक्का दिला. पण मी पडलो नाही, उडलो! (पोपट आहे मी, पडेन कसा? नॉन्सेन्स! ) त्या प्रकारात किरकोळ दुखापत झाली. दुखापतीपेक्षा मला राग विश्वासघाताचा आहे. मी रोज पेरु खात असे. सर्व फळांमध्ये मला पेरु सर्वात आवडतो. अडीच वर्षे मीदेखील इतरांना पेरु देत होतो. इतरही पेरु खात होते. पण त्याच्या बदल्यात मला काय मिळाले? कुणीतरी मला बचकभर मिरच्या खाऊ घातल्या…छे, आठवले की अजूनही आग होते. आईग्गं, किर्रर्र!

तुम्ही हल्ली खोक्यातून आलेली फळे खाता, आणि रोज आंबे खाता, हे ऐकून संताप झाला. अरे, कुठे फेडाल पापं…आँ? दुसऱ्याची तमा न बाळगता फळे खाता? पचणार नाहीत! बाकी, पोपट प्रजातीला मिरच्या खायला आवडतात, हे ज्या कुणा मानवाला सुचले तो अमानुष असला पाहिजे! एवढ्या मिरच्या माणसाने खाल्ल्या तर काय होईल? पण दिसला पोपट, दे मिरची असला प्रकार चालू असतो. मी पुन्हा सत्तेत आलो तर मला मिरच्या देणाऱ्या माणसाला टोपलंभर मिरच्यांचा ठेचा करुन, त्यात मीठ घालून…जाऊ दे! आईग्गं, किर्रर्र!

तात्पर्य एवढेच की, माझी चोच वासलेली नाही, पायही ताणलेले नाहीत. मी मेलेलो नाही. मविआचा पोपट पूर्ण जिवंत आहे, याची खात्री बाळगा. येत्या निवडणुकांमध्ये तुम्हाला ते दिसेलच. कळावे. आपला. पोपटराव हिरवे (मविआचा पोपट)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com