ढिंग टांग : भाई का गेम हुआ..?

डिअर भाई, सलाम. अब्बी ये खत लिखरेला है, लेकिन किसकू आऊर किधरकू भेजनेगा मालूम नै, करके इदरीच लिखरेला है. मेरेकू खत लिखनेका आदत नै, आऊर तुमकू पढनेका!.. पण काय करु?
Dawood Ibrahim
Dawood Ibrahimsakal

डिअर भाई, सलाम. अब्बी ये खत लिखरेला है, लेकिन किसकू आऊर किधरकू भेजनेगा मालूम नै, करके इदरीच लिखरेला है. मेरेकू खत लिखनेका आदत नै, आऊर तुमकू पढनेका!.. पण काय करु? मेरा नाम बबलू हटेला. माझा बाप पण ‘डी’ कंपनीत होता. त्याचं नाव मुन्ना थकेला!! पण एका एन्काऊंटरमध्ये गोळी हुकवण्यात फेल झाल्यामुळे तो खपला. (थकेलाच होता…) अनुकंपातत्त्वावर माझी भर्ती कंपनीत झाली.

आत्तापर्यंत माझ्यावर चारसोबिसीचे चौदा, हाफ मर्डरचे सात आणि तीनशे दोनचे दोन गुन्हे नोंद आहेत. बॉम्बेत हरेक पोलिसटेशनला आपली तसबीर कायम असते. आजवर मी जे काही करिअर करु शकलो, ते तुमच्यामुळेच भाई! तुम्हीच आमचे गॉडफादर आहात. शुक्रिया, मेहेरबानी!!

सुनने में आया की तुमकू किसने खाने में जहर दे दिया, इसलिए तुम कराची के ‘क़ेएम’में (पाकिस्तान में हास्पिटलकू केएमच बोलते क्या?) भरती कियेला है…कालच रातीला ‘नाइट बर्ड्स’ बारमधी (सेम…अपना कोपरा टेबल!) बसलो असताना समोरुन करमू बिल्ला आला. आल्या आल्या टेबलावर घोडा काढून ठेवला आणि बोलला की, ‘भाई, अपने लिए कॉटर मंगा, दिमाग हट गयेला है!’

मी विचारले, ‘क्यूं? तू क्या पायधुनी टेशन का सीनियर पीआय है?’

‘अरे, बबलूभाई, बुरी खबर है...अपने भाई को किसने जहर दे दिया, मालुम?,’ असे सांगून करमू बिल्ला ढसाढसा रडू लागला. मां कसम, आधीची ढकललेली सगळी कॉटर अर्जंट उतरली!! थोड्या वेळाने छोटा बबनच्या गँगमधून फोन आला. तो विचारत होता, ‘सच्ची है क्या? लाष्ट टाइमभी ऐसाच अफवा फैला था…’ मागल्या टायमाला तुमचा गेम झाल्याची खबर फुटली, पण नंतर तुमचा ज्यूस पितानाचा फोटो व्हायरल झाला. नंतर अनेक बिल्डर लोकांचे घाबरत घाबरत फोन आले. हिते आपल्यालाच काही टोटल लागत नाही, तर त्यांना काय सांगणार? पण भाई, असं कसं झालं?

ज्या डॉनच्या नुसत्या नावाने भल्या भल्या बिल्डर लोकांचा हाजमा बिघडतो, ज्याच्या नावाने अंडरवर्ल्ड चळाचळा कापते, जिसे पकडना मुश्किलही नही, नामुमकिन है, अशा डॉनला कुणीतरी येऊन सरळ जहर दिले? मागल्या खेपेला मी एका घरफोडीत बिझी असताना घरमालकाचा कुत्रा धावून आला. मी त्याला भजे खायला दिले. तीन मिनिटात साफ!! ही अशीच केस झाली ना? ‘हमारे डॉन की जान लेनेवाली गोली अभीतक बनाईही नहीं गई’ असे मी अभिमानाने सांगत होतो. गोली कू मारो गोली! डायरेक्ट जहर काम कर गया? ये तो लानत है, भाई!

तुमच्यासारखा जबरदस्त भाई किंवा डॉन साध्या जहरने जमीनदोस्त व्हावा, हे काही माझ्या दिलाला पटत नाही. डॉनचा ‘धी एण्ड’ कसा फिल्मी व्हायला पायजे. मोटारीचा पाठलाग, ढिशूम ढिशूम, हेलिकॉप्टरचा धमाका, एके ४७ च्या बुलेटची बौछार…बाद में धी एण्ड…पण साधं जहर? ह्या!! महाराष्ट्रात तुम्हाला घसीट के लाकर समुंदर में डुबाने का बडा प्लॅन था. नही हुआ.

तुम्ही कराचीमध्ये बसून आपल्या डी कंपनीचा कारोबार इज्जतमध्ये चालवला. पण गेले काही दिवस बेकार आहेत. बरेच अंडरवर्ल्डवाले बुलेट खाऊन संपत आहेत. लेकिन फिर भी, तुमच्यासारखा बडा डॉन जहर खाऊन मरेल, यावर आपला इस्वासच नाही, म्हणून तर हे खत लिहीत आहे.

कृपया खुशाली कळवण्यासाठी एक मिस कॉल द्यावा, ही रिक्वेष्ट आहे. आपका अपना. बबलू हटेला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com