ढिंग टांग : देव बरे करो! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing tang
ढिंग टांग : देव बरे करो!

ढिंग टांग : देव बरे करो!

मायमोगेस्त कमळाध्यक्ष चंदुदादाक मजो मानेचो यवकार, संक्रांतीची हुनहुनीत परबी.

सांगपाची गजाल अशी, गेलो आटवडाभर मजो गोयांत मुक्काम आसा. तुमकां कळै नस्ताना येऊचे पडले, याखातिर दिलगीर आसा, कित्याक तर हायकमांडांन माका ताबडतोबीन हांगा धाडलाँ. फुडली गजाल अशी की हांव हांगा आयलो की पक्षात फुडे आशील्ले लोक उठून चालपाक लागले, आन काँग्रेसीन गॅल्ले. पाड पडूं तांचे!! हांगा शींऽऽ (पक्षी : थंडी) खूप पडटा, पुण नागपुराइतकी न्हय...कुडकुडो मात आसा! लोकांक दिसता हांव भियॉन कडकडटा म्हणून. पाड पडूं तांचे!!

पात्रांव, माका एक सांग, हांगा पक्षांत हांव पळळो एकटो. हांव वचून मेळ्ळो, तर तो परत चलपा लागत, हो भय! तर हांव हांगा करुं किदें? कोणाच्या खांद्यार हांत दवरुं? हांव नुस्ते खांय ना, सोरॉय पीना, तर कोरु किदें? मुदरत कळैचे, ह्या पत्रांक ताबडतोबीन उतर धाडचें. वाट पळैतां. तुमचोच. नानासाहेब फ.

ता. क. : गोंयांत आपलॉ पक्ष वाचुपा खातीर शतप्रतिशत सर्जिकल स्ट्राइक करपाची गरज आसा, अशे माका दिसता. तर कुणीएक खंबीर सरदार तातडीन धाडून दिवपाचे पळैयात. हायकमांडाक मजो एसओएस धाडचो. देव बरे करो!!

मा. फडणवीसनाना, तुमचे कोंकणीतले पत्र वाचले. मायना वाचूनच दोन मिनिटे निपचित पडलो. पत्र कोकणीत कां लिहिलें? गोव्यात गेल्यावर तिथला रंग चढला की काय? मला काळजी वाटू लागली आहे. तुम्ही मायन्यातच ‘मानेचो यवकार’ असे म्हटले आहे. मान अवघडली आहे का? बाम लावावा. आम्ही कोल्हापूरकडली साधीसुधी माणसे. गोमंतकाशी जवळीक असली तरी हे म्हंजे जरा अतीच झाले. मी क्वचित कधी गोव्याला गेलो तर शुद्ध मराठीत किंवा हिंदीत संवाद साधतो. तुम्हीही तसेच करावे. तुम्हाला तेथे पक्षाने निवडणूक प्रभारी म्हणून पाठवले आहे, भाषा शिकायला नव्हे!! मागल्या खेपेला आपले मा. गडकरीसाहेब गोव्यात जाऊन चक्क सरकार स्थापन करुन आले होते. त्या काळात अनेक गोंयकार एकमेकांना ‘काय बे? चल फूट...’ असे अस्सल नागपुरी शैलीत संबोधू लागले होते, असे म्हणतात! तुम्ही त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा.

तुमचे पत्र काही मित्रांना दाखवले. त्यांनी खांदे उडवले, नाक खाजवले आणि बरेच काही काही करुन ‘आपल्याला नाही बुवा ही सांकेतिक भाषा कळत’ असे सांगून टाकले. आपले सिंधुदुर्गसम्राट मा. राणेदादा यांनाही पत्र दाखवले. ते (तोंड वाकडे करुन) म्हणाले, ‘‘आवशीक खाव, ह्या मेल्या काय लिवलंस?’’ मी निमूटपणे उठून आलो.

अखेर पत्र तसेच्या तसे दिल्लीला हायकमांडकडे धाडले. त्यांनी अचूक संदेश वाचला. ज्या पक्षनेत्याला तुम्ही भेटता, तो उठून दुसऱ्या पक्षात जातो, अशी वेदना तुम्ही व्यक्त केली आहे. तसेच तुम्ही एकटे पडला आहात, सबब कुणीतरी चांगला पक्ष सहकारी जोडीला पाठवावा, अशी तुमची मागणी आहे... बरोबर ना? मग ऐका तर-

आपले एक पक्षसहकारी तयार आहेत. अतिशय कार्यक्षम म्हणून त्यांचा लौकिक आहे. हरियाणामध्ये ते प्रभारी होते. दहा दिवसांपूर्वी त्यांनी चंडिगडमध्ये आपल्या पक्षाचा महापौर निवडून आणण्याचा चमत्कार घडवून आणला होता. ते आपल्या पक्षाचे छुपे अस्त्र-याने की सीक्रेट वेपन आहेत. त्यांचे नाव-वीरविनोद तावडेजी! पाठवू का त्यांना? कळवावे.

आपला, चंदूदादा कमळाध्यक्ष.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top