Dhing tang
Dhing tangsakal

ढिंग टांग : द्वारकेच्या समुद्रातील संशोधन...!

कार्यक्रम नेहमीचाच. निवासस्थानाच्या हिरवळीवर दिल्लीच्या मोरांना दाणे खिलवण्याचा. श्रीमान नमोजीभाई मोरांना बोलावून बोलावून दाणे खिलवत आहेत.

स्थळ : ७, लोककल्याण मार्ग, दिल्ली. वेळ : बप्पोरे.

कार्यक्रम नेहमीचाच. निवासस्थानाच्या हिरवळीवर दिल्लीच्या मोरांना दाणे खिलवण्याचा. श्रीमान नमोजीभाई मोरांना बोलावून बोलावून दाणे खिलवत आहेत, आणि श्रीमान मोटाभाई चिंतित अवस्थेत बंगल्याच्या पायऱ्यांवर बसून गुडघे चोळत आहेत. यांना चिंता मोरांची, त्यांना मतांची!! मोरही सावधपणे पावलं टाकत नमोजीभाईंच्या हस्ते दाणेफराळ करत आहेत. अब आगे...

नमोजीभाई : (दाणे फेकत) ऑ...ऑ...ऑ...जे श्री क्रष्ण, जे श्री क्रष्ण!

मोटाभाई : (अनवधानाने) जे श्री क्रष्ण! क्या रे आव्या?

नमोजीभाई : (मोरांच्या मागे धावत) काले आव्या! अरे आ नान्हा मोर मने बहु सारु लागे! भरुचना प्रख्यात खारासिंग एनेमाटेज लै आव्या छे!! ऑ...ऑ...ऑ... (‘भरुचना प्रख्यात खारासिंग’ हे शब्द ऐकताच काही दिल्लीचे मोर थबकतात, आणि एकमेकांकडे बघतात.)

मोटाभाई : (निवडणुकीच्या चिंतेत-) हुं कहुं छूं, के आवती चूंटणी मां-

नमोजीभाई : (दिलासा देत) चूंटणीची चिंता हवे ना करो, मोटाभाई! अबकी बार चारसो पार...गॅरंटी!! (दोन दिल्लीचे मोर एकमेकांकडे बघून खांदे उडवल्यागत पंख उडवतात.)

मोटाभाई : (खुशीची गाजरं खात) तमारे मोडा मां घी अने शक्कर...डब्बल चम्मच!!

नमोजीभाई : (उत्साहात) ...काले हूं द्वारका गया हता, खबर छे ने? (दोनचार मोर चमकतात.)

मोटाभाई : (जांभई आवरत) हांऽऽ... त्यां स्कूबा डायविंग किधा ने? केटलो ढाढस छे!! वाहवा, वाहवा!!

नमोजीभाई : (द्वारकेच्या आठवणीत) बहु मज्जानु वात!! एकदम स्पिरिच्युअल अनुभव हता!!

मोटाभाई : (भक्तिभावाने हात जोडत) मने बतावो तो!!

नमोजीभाई : (डोळे मिटून) द्वारकामध्ये गेलो! तिथं नौदलाचे काही पाणबुडे होते! एने कह्यु के, भाई, मने तो समंदर मां डुबकी लगावानी बहु इच्छा छे!! दोन नॉटिकल माइल्स समंदरमधी नेऊनशी त्यांनी मला हेल्मेट दिला, अने ओक्सिजन सिलिंडर! मी म्हटलं, ‘मला ऑक्सिजनची जरुरत नाही, लोगांच्या प्रेम हाच माझा ओक्सिजन!!’

मोटाभाई : (भक्तिभावाने लवत) जे श्री क्रष्ण, जे श्री क्रष्ण!!

नमोजीभाई : (दुर्लक्ष करत) हेल्मेट घालूनशी मी समंदरमधी खाली गेला! हाथ मां एक मोरपंख हता! भगवान क्रष्णला मोरपंख लई आवडते!! (आपल्यामागे पिसारा आहे की नाही, याची चाचपणी एक-दोन मोर गपचूप करतात.)

मोटाभाई : (बेसावधपणे) मोरपंख कुठे मिळाला?

नमोजीभाई : (मोराला दाणे टाकत) आ नान्हा मोर छे ने...त्याने दिला!! (नान्हा मोर थोडासा विव्हळतो. पण गुमान दाणे टिपू लागतो.)

मोटाभाई : (द्वारकानुभवात बुडी घेत) संमदरमधी काय बघितला?

नमोजीभाई : (इतिहासकाराच्या आविर्भावात) भगवान श्रीक्रष्णजींनी द्वारका बुडवली, तिचे अवशेष बघितले!! तिथं बसून मी थोडा ध्यान केला!! अगरबत्ती पेटवणार होतो, पण पेटलीज नाय!! बाकी बध्दा पाषाण, पाषाण, पाषाण!! पण त्येच्या दरसनमात्रेज मला एकदम भारताच्या उज्ज्वल भविष्य दिसला! मी डिसिजन घेतला! -हुं भारतने द्वारकाजेवा बनावीश!! उंची इमारत, महल, मंदिर...एकदम डिट्टो द्वारका!!

मोटाभाई : (अधीरतेनं) आणखी काय काय सापडला समंदरमधी?

नमोजीभाई : (उत्खनन करणाऱ्या संशोधकाच्या उत्साहात) एक पुरातन बॉक्स सापडला! मने तो लागे, द्वापारयुगच्या काळातला ते इव्हीएम मशीन असणार!

मोटाभाई : (आश्चर्यचकित होत्साते) शुं वात करे छे? द्वापारयुगना इव्हीएम! आ तो सुभसकुन छे!!

नमोजीभाई : (आत्मविश्वासाने) एटलामाटेज कहुं छुं, अबकी बार, चारसो पार...गॅरंटी! (पुढ्यातले पंधरावीस मोर इथे मुकाट्याने पिसारा फुलवून नाचू लागतात.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com