ढिंग टांग : अर्ज किया है...!

मेरे दोस्त वझीरेआजम-ए-हिंदोस्तां जनाब मोदीसाब को प्यारा पडोसी नवाझभाई का तहेदिलसे सलाम. खत-औ-खुतूत लिखण्याची वजहा हीच की बहोत दिनसे तुमची काही खबर नाही.
Dhing Tang
Dhing Tangsakal

मेरे दोस्त वझीरेआजम-ए-हिंदोस्तां जनाब मोदीसाब को प्यारा पडोसी नवाझभाई का तहेदिलसे सलाम. खत-औ-खुतूत लिखण्याची वजहा हीच की बहोत दिनसे तुमची काही खबर नाही. २०१५ साली तुम्ही अचानक माझ्या मुल्कात मेरे मकान-ए-गरीबमध्ये नक्श-ए-कदम ठेवून माझ्या जिंदगीत रोशनी फैलावली होती. तेव्हापासून मी एक ख्वाब बुनतो आहे...मी पुन्हा पाकिस्तानचा वझीरेआजम झालो आहे.

आणि शहर-ए-अहमदाबाद येथे सरप्राइज व्हिजिट देऊन तुमच्या महलनुमा घरात झूल्यावर झूलत नारियलपानी पीत आहे...दरअसल हे ख्वाब मला फज्जरच्या काळातच पडले होते. ख्वाब-ए-फज्जर याने की पहाटेचे स्वप्न खरे होते असे म्हणतात ना? अर्ज किया है-

मेरे हमदम, मेरे हमसफर तिरे मुल्कमें गुलिस्ताँ फूल रहे,

औ, हम है के, ख्वाब-ए-हकिगत में बागों में झूल रहे!...

खैर! आमच्या मुल्कात सध्या टमाटर पांचसौ रुपये किलो और प्याज तीनसौ रुपये किलो झाला आहे. मेहेंगाई आसमानला छूते आहे. इतना की लहसनभी मोगरे के अंदाज में बिका जा रहा है. मुल्क-ए-पाक भिकेला लागण्याआधीच जाऊन परिस्थिती सुधरावी, या इराद्याने मी परत आलो. यहां मुझे मोदीसाब, आप जैसा काम करना है! आपकी मदद की बहोत जरुरत है...

सुना के हालही में आपण हिंदोस्तां के तीन मुल्कों में चुनाव जिंकलात. आपकी जानी दुश्मन पार्टी कांग्रेस बुरी तरह से हारली. तुम्हाला मुबारक बात!! अर्ज किया है-

जीतना चाहो किसी का दिल तो लडो चुनाव

जीता चाहो किसी का दिल तो लडो चुनाऽऽव,

वरना इस सियासत में रख्खा क्या है?

...कसा वाटला माझा नवाकोरा शेर? चुनाव जिंकल्यानंतर तुम्ही म्हटले होते की सियासतमध्ये झूठे वादों के बजाय व्होटरों का दिल जीतो! त्या डायलॉगवरुन मला हा शेर सुचला. आमचे आधीचे वझीरे आजम मधल्या काळात गोलंदाजी करत होते. एका गोलंदाजाला मुल्क सांभाळायला कसा दिला, याचाच मला अचंबा-औ-अफसोस वाटतो. पण खैर! नसीब से आगे और जरुरतसे जादा किसीको कुछ नहीं मिलता. त्यावेळी मी इंग्लंडमध्ये राहात होतो. खूप वेळ हाताशी होता. तेव्हा ही शेरोशायरीची आदत लागली. सॉरी! नुकताच मी इंग्लंडहून पाकिस्तानात घरवापसी केली आहे. मला कैदखान्यात टाकण्याची कसम खाणारे इमरान खान स्वत:च कैदखान्यात जाऊन बसले आहेत. (म्हणून मी घरवापसी केली.) येत्या फेब्रुवारीमध्ये आमच्या मुल्कात चुनाव होणार असून मी पुन्हा वझीरेआजम होण्यासाठी धडपडतो आहे. सोचा, क्यूं नं अपने एक्सपर्ट दोस्त से सलाह-मशवरा करुं. उससे चुनाव जीतने का फार्म्युला हासिल करुं?

खैर! अर्ज किया है-

बता दो ऐ दोस्त मुझे फार्म्युला-ए-जीत,

बता दो, ऐ दोस्त मुझे फार्म्युला-ए-जीत,

वरना यह लम्हा भी अब जायेगा बीत!

...मोदीसाहब, मुझे आपसे दोस्ती बर्करार रखनी है. बंगलादेश, श्रीलंका, नेपाळ, इराण, चायना आणि बहुत साऱ्या देशांशी मला दोस्ती करायची आहे. तुमची मदत मिळेल ना? इंतजार करतो. शुक्रिया मेहेरबानी. आपका अपना. शरीफ नवाझ. (माजी) वझीरेआजम-ए-पाकिस्तान.

पत्रोत्तर :

नवाझभाई, जे श्री कृष्ण. अर्ज करुं छुं-

जीत नां फार्म्युला शुं बताऊं, तमे तो छो कंगाल,

जी-२० नी खबर नथी, तारी पासे माल, ना ताल

जाग्या त्याथी सवार, अने न बोलवा मां नौ गुण

वापिस जावो इंग्लंड, हवे मारी गल सुण!

...कछु सांभळ्यो? नमो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com