येत्या काही काळात तीन टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. आपल्या पक्षाला तीन टप्पी नॉटआऊट हाच नियम असला तरी कुणी गाफील राहू नये. सरपटी चेंडूवरही चांगले चांगले फलंदाज विकेट टाकून परतल्याची इतिहासात उदाहरणे आहेत! असो.
आपण शक्यतो महायुतीतच लढणार आहोत. महायुती म्हटले की पाठोपाठ महायुतीधर्म आला! जिथे हा धर्म पाळता येईल, तिथे पाळावा. जिथे पाळता येणार नाही, तिथे कमळधर्म पाळावा. तेही शक्य नसल्यास श्रावण पाळून गुमान घरी बसावे!!