

Local Self Goverment Election Stratergy
sakal
स्थळ : अज्ञात. वेळ : अज्ञात. पात्रे : ट्रिपल इंजिन!
दादासाहेब : (अंधाऱ्या गुप्त खोलीत प्रवेश करत) कुणी बसलंय का हिते? डोळ्यात बोट घातलं तरी दिसंना!
भाईसाहेब : (अंधारातून खुर्ची सरकवल्याचा आवाज) या, या, दादासाहेब! तुमची वाट बघत केव्हापासून येऊन बसलोय!
दादासाहेब : (धडपडल्याचे आवाज) दिवे तरी लावा!
भाईसाहेब : (पुन्हा खुर्ची सरकवल्याचा आवाज) नानासाहेब आले की पडेलच उजेड! इलेक्शनच्या तारखा जाहीर झाल्या आहेत, आता महाराष्ट्रभर उजेडच उजेड पडणार! तोवर घ्या इथं बसून!