

Understanding the Sudden Rise of Leopards in Human Areas
sakal
सांप्रतकाळी महाराष्ट्रात बिबट्यांनी धुमाकूळ घातला आहे. पूर्वी वाघाचा आवाज होता. पण बिबट्यांनी आपले वाघपण टाकले, आणि त्यांचे बिबटे झाले, असे राजकीयदृष्ट्या पाहू गेल्यास म्हणता येईल. एरवी जंगलात शांत जीवन व्यतीत करणारे बिबटे गल्लीतल्या श्वानांप्रमाणे गावगल्ल्यांमध्ये कां हिंडू लागले? अचानक त्यांची संख्या वाढण्याइतके त्यांचे वन्यजीवन रोम्यांटिक का बरे झाले? बिबट्यांस मानवाशी मैत्री करायची आहे की दुश्मनी? अधिवास नेमका कोणी कोणाचा ढापला? माणसाने बिबट्यांचा की बिबट्यांनी माणसांचा? असे अनेक प्रश्न जबडा वासून सुळे दाखवत उभे आहेत.