dhing tang
sakal
आजचा दिवस : विश्वावसु संवत्सरे श्रीशके १९४८ अश्विन शु. अष्टमी.
आजचा वार : मंडेवार.
आजचा सुविचार : मैं ही मैं अब तुम्हारे ख़यालों में हूँ, मैं जवाबों में हूँ, मैं सवालों में हूँ, मैं तुम्हारे हर एक ख़्वाब में हूँ बसा, मैं तुम्हारी नज़र के उजालों में हूँ, देखते हो मुझे, देखते हो जहाँ, मैं यहां हूं, यहां हूं यहां हूं यहांऽऽ…
नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे. जपाचा लक्ष पुरा होत आला. वही बदलली पाहिजे.) दिल्लीला जाणे एक प्रकरणच होऊन बसले आहे. गपचूप गेले तर बोंबाबोंब होते, राजरोस गेले तरीही होते! माणसाने दिल्लीला जायचे तरी कसे? परवा मी दिल्लीला जाऊन आलो, आणि इथे महाराष्ट्रात गडबड उडाली. मी कायमचाच दिल्लीला गेलो, अशी अफवा कोणीतरी उठवली…