dhing tang
sakal
सुविख्यात आयुर्वेद धन्वंतरी आणि ‘निघंटु’कार खलौषधी निर्माते श्रीश्री आयुर्जितशास्त्री वाचस्पती हे नाव आपण ऐकले आहे काय? ते आम्हीच. नाडीपरीक्षेत आम्ही प्रवीण आहोत, हे तर आमच्या पायघोळ पैजाम्यावरुन कोणीही ओळखेल. नाडी सोडा, (सोडा म्हणजे, विषय सोडा याअर्थी-) नुसत्या दृष्टिक्षेपानेही आम्ही रुग्णाची हालत जाणून घेतो. रक्तदाब तपासण्यासाठी आम्हाला आजवर कधीही रुग्णाचा हात बगलेत मारावा लागलेला नाही.