

Election Rhetoric and Power Games in Mumbai
sakal
दादू : (उत्सुकतेनं फोन फिरवत) म्यांव म्यांव..म्यांव म्यांव..!
सदू : (वैतागून) शी:! हा कुठला रिंगटोन आहे दादूराया…बदल आता तो!
दादू : (ओशाळून) त्यात थोडी गंमत! मागल्या वेळेला वाघाची डरकाळी रिंगटोन म्हणून वापरली होती…
सदू : (कुतुहलानं) मग?
दादू : (हिरमुसून) लाभली नाही! डरकाळीची आपोआप म्यांव म्यांव झाली!!
सदू : (विषय बदलत) नागपूरहून कधी आलास?
दादू : (सहज सांगितल्यागत) लग्गेच! विमानतळावर उतरलो! ‘अरायवल’मधून टर्न घेऊन ‘डिपार्चर’मध्ये गेलो!..