dhing tang
sakal
ठाणे, ता. २२ - गायमुख ते कॅडबरी जंक्शन या मेट्रो ४ ए मार्गावरील मेट्रोगाडीची चाचणी सोमवारी सकाळी यशस्वीरित्या पार पडली. पहिल्या चाचणीतच ठाणेकरांच्या गर्दीने सारे विक्रम मोडले, असे सूत्रांनी सांगितले. महाराष्ट्राचे लाडके कारभारी नानासाहेब फडणवीस आणि लाडके उपकारभारी कर्मवीर भाईसाहेब (मु. पो. ठाणे) या दोघांनीही जोडीने मेट्रो गाडी चालवून पाहिली.