ढिंग टांग : रिक्षा परीक्षा : १०७ दिवसांत भाषाभूषण..!

येत्या एक मेपासून १०७ दिवसांत खाड खाड मराठी शिकण्याची सुवर्णसंधी आमच्या रिक्षा-टॅक्सीचालक बांधवांकडे चालून आली आहे.
Dhing Tang

Dhing Tang

sakal

Updated on

येत्या एक मेपासून १०७ दिवसांत खाड खाड मराठी शिकण्याची सुवर्णसंधी आमच्या रिक्षा-टॅक्सीचालक बांधवांकडे चालून आली आहे. अवघ्या १०७ दिवसांत आजवर कुणीच मराठी भाषा शिकू शकलेले नाही. एक मेपासून १५ ऑगस्टपर्यंत मराठी शिकून घ्यावी, अन्यथा कारवाईस तयार राहावे, असा इशारा परिवहन विभागाने दिला आहे. ही ‘विपदा में संधी’ आहे. उत्तम मराठी शिकणाऱ्या ‘रिक्षार्थीं’ना मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय आणि परिवहन विभागातर्फे रीतसर प्रमाणपत्र बहाल करण्यात येणार आहे. या १०७ दिवसांच्या धडक अभ्यासक्रमात (पक्षी : क्रॅश कोर्स) मराठीचे जुजबी, मध्यम आणि प्रवीण असे टप्पे असणार आहेत. प्रवीण रिक्षावाल्यास स्वत:च्याच रिक्षात मागील बाजूस बसणेचा मान मिळेल!

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com