dhing tang
sakal
स्थळ : ७, लोककल्याण मार्ग, न्यू डेल्ही. वेळ : बप्पोरे.
बंगल्याच्या आवारातले डझनभर मोर बर्थ डे पार्टीला नेमका कुठला डान्स बसवायचा, याची चर्चा करत आहेत. जन्मदिनाचा मानकरी ऊर्फ श्रीनमोजीभाई मोरांना शेंगदाण्याचा दैनंदिन खुराक वाटत आहेत. रोज ‘भडोचनी प्रख्यात खारी सींग’ खाऊन कंटाळलेल्या मोरांना आज निदान काजू बदाम मिळावेत! पण नाही. शेंगदाणेच पुढ्यात पडले…बंगल्याच्या पायऱ्यांवर गुडघे चोळत श्री. मोटाभाई चिंताग्रस्त अवस्थेत बसले आहेत. कधी संपणार शेंगदाणे? हा त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव आहे. अब आगे…