

Political Satire on Raj Thackeray, Bhojpuri Songs and Maharashtra Politics
esakal
नेमकी तीथ सांगावयाची तर ती आश्विनातली दिवाळीनंतरची तीथ होती. टळटळीत सकाळ झाली. मुंबापुरीतील तमाम चाकरमानी आपापल्या उद्योगाला लागून लोकलगाडीला लटकण्यासाठी कळपाकळपाने निघाले होते. काहींनी बसला लटकून घेतले, काही विनाकारण दौडणाऱ्या मेट्रोकडे वळले. या धबडग्यापासून संपूर्णपणे अलिप्त अशा शिवाजी पार्कात मात्र कबुतरे घुमत होती. या मेल्या कबुतरांना दुसरे उद्योग नाहीत! शी:!! पण ते जाऊ दे. अशा शांतसमयी ‘शिवतीर्थ’ गडावरील वातावरण अद्रकयुक्त चहासारखे उकळलेले होते.