दादू : (बिचकत बाचकत फोन फिरवत) म्यांव म्यांव..!
सदू : (थंडपणाने फोन उचलत) बोल दादूराया, ओळखला तुझा आवाज!
दादू : (संशयानं) आसपास कोणी आहे का तुझ्या?
सदू : (थंडपणाचा कळस..) माझ्या आसपास नेहमी मीच असतो! मैं और मेरी तनहाई अक्सर ये बाते करते है, तुम होते तो ऐसा होता, तुम होते तो वैसा होता…
दादू : (हात चोळत) तुम होते तो ऐसावैसा होता, हे कोणी सांगितलं नाही आपल्याला!! जाऊ दे! आता पुढे काय करायचं?
सदू : (कोड्यात) जे आपण कधीच ठरवलं नाही तर आता का ठरवायचं?