Anesthesiology : भूलशास्त्र नेमके काय असते? जाणून घेऊया...

article on what is  anesthesiology by doctor mahendra gupta
article on what is anesthesiology by doctor mahendra guptaesakal

"मित्रांनो, भूलशास्त्र गेल्या काही दशकांत खूप मोठ्या प्रमाणात प्रगत झाले आहे. अठराव्या शतकाच्या मध्यात या भूलशास्त्राच्या उत्पत्तीचे वेगवेगळे प्रयोग घडू लागले. तत्पूर्वी, भूल ही ऑपियम, मिल्क ऑफ पोपी, मद्य पाजून किंवा वनस्पतींच्या काही भागांचा रस वापरून दिली जायची किंवा कुठल्याही प्रकारची भूल न देता अतिशय वेदनादायक अशी ती शस्त्रक्रिया किंवा जे काही उपचार असायचे ते केले जायचे.

अठराव्या शतकाच्या मध्यात इथर नावाच्या औषधाचा प्रयोग श्वासावाटे करून पूर्ण भूल देऊन एक शस्त्रक्रिया पूर्ण जगाच्या समोर दाखविण्यात आली आणि त्या दिवशी भूलशास्त्राची गुढी उभारली गेली. कालांतराने वेगवेगळे प्रयोग होऊ लागले. पूर्ण भुलीव्यतिरिक्त इतर प्रकारची भूल आहे का, याचे संशोधन आणि क्रमाने प्रयोग होऊ लागले." - डॉ. महेंद्र गुप्ता, सचिव, आय.एस.ए., नाशिक (article on what is anesthesiology by doctor mahendra gupta)

एकविसाव्या शतकात आज भूलशास्त्र हे अतिशय प्रगत झालेले असून, कुठलीही अवघड आणि गुंतागुंतीची शस्त्रक्रिया लीलया पेलण्याचे आणि पूर्णपणे वेदनारहित करण्याचे महत्त्वाचे काम या शास्त्राने पूर्ण केले आहे. अजूनही या शास्त्रात नवनवीन शोध लागत आहेत. आज आपण जाणून घेऊया, भुलीचे वेगवेगळे प्रकार. भूलशास्त्रात मुख्यत्वे भुलीचे तीन प्रकार असतात.

१) संपूर्ण भूल (General anaesthesia)

२) शरीराचा काही भाग करणे (Regional anaesthesia)

३) जागेवरची भूल (Local anaesthesia)

संपूर्ण भूल यात तीन प्रकार असतात. फक्त शिरेद्वारे दिली जाणारी भूल (TIVA Total Intra-venous anaesthesia) ः अशा प्रकारची भूल छोट्या, कमी वेळेच्या शस्त्रक्रियांमध्ये दिली जाते.

दुसरा म्हणजे फक्त वायूद्वारे दिली जाणारी भूल (TIA Total inhalational anaesthesia) ः वायू स्वरूपात भुलीचे औषध वापरून भूल दिली जाते.

तिसरा आणि सर्वांत महत्त्वाचा प्रकार म्हणजे बॅलन्स जनरल अनेस्थेशिया ः याच्यात शिरेद्वारे, वायू स्वरूपात, वेगवेगळ्या प्रकारचे औषध देऊन एक समतोल साधला जातो. या प्रकाराद्वारे मोठ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया (Major surgeries) जसे हृदयाच्या, आतड्यांच्या, पोटाच्या, मेंदूच्या मणक्यांच्या, वेगळ्या अवयवांच्या शस्त्रक्रिया केल्या जातात.

article on what is  anesthesiology by doctor mahendra gupta
Health Tips : सकाळी ९ पर्यंत लोळत पडाल तर या चांगल्या गोष्टींना मुकाल; जाणून घ्या लवकर उठण्याचे फायदे

याच्यात तीन महत्त्वाच्या गोष्टी घडतात. ज्यांना संपूर्ण भुलीचे तीन आधारस्तंभ म्हणता येईल. अॅमनेशिया (शस्त्रक्रियेदरम्यान घटनांचा विसर पडणे), अँनालजेशिया (वेदनाहरण), मसल रेलॅक्सेशन (Muscle relaxation).

भुलीचा दुसरा प्रकार म्हणजे रिजनल अनेस्थेशिया (Regional anaesthesia) ः शरीराचा काही भाग बधिर करणे. याच्यात काही प्रकार आहेत. त्यातील पहिला प्रकार म्हणजे मणक्यांमध्ये एका विशिष्ट ठिकाणी दिली जाणारी भूल (Spinal, Epidural) सिझेरियन शस्त्रक्रिया, गर्भाशयाच्या शस्त्रक्रिया, सांधेरोपण, मुतखड्याच्या आणि वेदनारहित प्रसूतीच्या भुलीसाठी या प्रकारची पद्धत वापरली जाते.

तसेच फक्त हात, पंजा किंवा पाय, किंवा पायाचा काही भाग बधिर करणारी भूल (PNB- Peripheral nerve block). खास करून हात आणि पायाच्या हाडांच्या शस्त्रक्रियांसाठी मुख्यत्वे या प्रकारच्या भुलींचा वापर केला जातो. जेणेकरून शस्त्रक्रियेदरम्यान आणि शस्त्रक्रियेनंतर दीर्घ काळासाठी वेदनाशमन होते.

article on what is  anesthesiology by doctor mahendra gupta
Yoga For stress : फार स्ट्रेस आहे? स्ट्रेसमधून बाहेर पडण्यासाठी करा हा योगा, जाणून घ्या योग्य पद्धत

भुलीचा तिसरा प्रकार म्हणजे लोकल अनेस्थेशिया (Local anaesthesia) किंवा जागेवरची भूल ः यात Topical anasthesia, जसे डोळ्यांच्या शस्त्रक्रियेत भुलीचे औषध डोळ्यांवर टाकून डोळ्याचा दर्शनी भाग बधिर करून शस्त्रक्रिया केली जाते.

यातील दुसरा प्रकार म्हणजे इफिल्ट्रेशन (Infiltration anaesthesia) या म्हणजे एखादी छोटीशी त्वचेखालची गाठ काढणे, मार लागून झालेली छोटीशी जखम शिवणे, किंवा बोटांची शस्त्रक्रिया, केश प्रत्यारोपणासाठी लागणारी भूल किंवा पोटावरची चरबी काढण्यासाठी लागणारी भूल अशा वेगवेगळ्या कारणांसाठी या प्रकारच्या भुलीचा वापर केला जातो.

आज आपण जाणून घेतले भुलीचे वेगवेगळे प्रकार. या प्रत्येक प्रकारांचे काही दुष्परिणाम आहेत आणि खूप सारे फायदेही आहेत. हे सर्व शस्त्रक्रियेच्या आधी भूलतज्ज्ञांकडून योग्य प्रकारे समजून घेऊन योग्य ती भूल निवडून शस्त्रक्रिया सुखरूप पार पाडता येते. भूलशास्त्र आणि भूलतज्ज्ञ यांच्याबाबत नवं काहीतरी आज आपण जाणून घेतले.

तुम्ही डोळे झाकून जो विश्वास भूलतज्ज्ञांवर टाकतात, तो विश्वास आम्ही सर्व सार्थ ठरवू.

We Care, When you are not aware.

article on what is  anesthesiology by doctor mahendra gupta
Health Care News: महिलांनो.. तुम्हालाही PCOS चा त्रास होतोय? मग या हेल्दी स्मूदीजचा आहारात समावेश करा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com