आजचे राशिभविष्य - 01 एप्रिल 2021

sakal rashibhavishya
sakal rashibhavishya

१९२८ : पुणे वेधशाळेच्या कामाला प्रारंभ. त्यापूर्वी हवामान खात्याचे काम सिमला येथून चालत असे. त्यामुळे वेधशाळेला सिमला ऑफिस असे म्हटले जाई. सत्तर वर्षांनंतरही ते नाव अजूनही रूढ आहे.
१९३३ : भारतीय हवाई दलाच्या पहिल्या विमानाचे कराची येथे औपचारिक उड्डाण. 
१९३५ : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या मध्यवर्ती बँकेची स्थापना.
१९५७: मुंबई राज्यात कूळ कायदा मंजूर करण्यात आला. या कायद्याने कुळाला शेतजमिनीची मालकी देण्यात आली. 
१९९९ : पिनकोड क्रमांक पद्धतीचे जनक व संस्कृतचे गाढे अभ्यासक श्रीराम भिकाजी वेलणकर यांचे निधन. 
२००० : ज्येष्ठ कवयित्री संजीवनी मराठे यांचे निधन.
२००१ : मराठीतील ज्येष्ठ समीक्षक प्रा. गो. म. कुलकर्णी यांचे निधन. 
२००२ : आंबेडकर चळवळीचे अभ्यासक, ज्येष्ठ साहित्यिक वसंत मून यांचे निधन. डॉ. आंबेडकर यांचे अप्रकाशित साहित्य संपादित करून वीस खंडांत प्रकाशित करण्याची जबाबदारी राज्य सरकारने त्यांच्यावर सोपविली होती.

मेष : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.

वृषभ : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. आध्यात्मिक क्षेत्राकडे कल राहील.

मिथुन : नवीन परिचय होतील. संततीचे प्रश्न मार्गों लागतील.

कर्क : काहींना बढ़तीची शक्यता आहे. आर्थिक सुयश लाभेल. जिद्द वाढेल.

सिंह : महत्त्वाची बातमी समजेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

कन्या : आरोग्य उत्तम राहील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल.

तूळ : वादविवाद टाळावेत. आरोग्य उत्तम राहील.कामात सुयश लाभेल.

वृश्चिक : खर्चाचे प्रमाण वाढेल.महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

धनू : नवीन परिचय होतील. संततीचे प्रश्न मार्गी लागतील. वैवाहिक सौख्य लाभेल.

मकर : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव येतील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

कुंभ : तुमच्या कार्यक्षेत्रात प्रसिद्धी लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

मीन : साहित्यिक क्षेत्रातील व्यक्तींना दिवस चांगला आहे. भाग्यकारक घटना घडेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com