इतिहास घडवणारा ‘मुगल-ए-आझम’

एकेकाळी मुंबईमध्ये दादरला खोदादाद सर्कलच्या इथे ब्रॉडवे सिनेमागृह होतं.
History maker Mughal-e-Azam movie director film cinema
History maker Mughal-e-Azam movie director film cinemasakal
Summary

एकेकाळी मुंबईमध्ये दादरला खोदादाद सर्कलच्या इथे ब्रॉडवे सिनेमागृह होतं.

एकेकाळी मुंबईमध्ये दादरला खोदादाद सर्कलच्या इथे ब्रॉडवे सिनेमागृह होतं. त्या थिएटरसमोरचा जो फूटपाथ आहे, तिथे एक टेलरिंगचं दुकान होतं. त्याचा मालक असामान्य स्वप्नं पाहणारा एक सामान्य माणूस होता.

त्याला सिनेमात जायचं होतं आणि भव्यदिव्य सिनेमा काढायचा होता. असा की, तोपर्यंत तसा सिनेमा आलाच नसेल. त्या टेलरचं नाव होतं के. आसिफ. त्याने जे भव्यदिव्य सिनेमा काढायचं स्वप्न पाहिलं आणि ते पूर्ण केलं, तो सिनेमा होता मुगल-ए-आझम.

योगायोगाने त्या सिनेमाचं संगीतसुद्धा त्याच फुटपाथवर झोपणाऱ्या माणसाने दिलं, त्याचं नाव नौशाद. दोघांनी मिळून एक प्रचंड मोठा इतिहास निर्माण केला. शिंपीकाम हा के.आसिफ यांच्या घराण्याचा व्यवसाय होता.

आचार्य अत्रे गेले त्या वेळी त्यांच्या अंत्ययात्रेत के. आसिफ सहभागी झाले होते. का झाले असतील? तर, सुरुवातीला ते सिनेमा क्षेत्रात आले तेव्हा अत्रेंच्या चित्रपट कंपनीच्या टेलरिंग डिपार्टमेंटमध्ये ते काम करत होते, ही गोष्ट ते विसरले नव्हते. कारण तिथूनच खरी सुरुवात झाली त्यांच्या सिनेमाच्या करिअरची. आज मी तुम्हाला त्याचीच गोष्ट सांगतो.

त्या सिनेमानंतर त्याना असं जाणवलं की, आता ‘मुघल-ए-आझम’ची आपण तयारी करायला हवी. त्यात चंद्रमोहन अकबराची भूमिका करणार होता आणि सोळा वर्षांची नर्गीस अनारकली होती. सात-आठ रिळं झाली आणि सिनेमा डब्यात गेला. तो डब्यात पडला त्याचं कारण एक तर चंद्रमोहन १९४९ मध्येच या जगातून निघून गेला. सलीमची भूमिका करणारा सप्रू हिरो म्हणून बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरत होता, तरी हा माणूस स्वप्न डोक्यातून काढून टाकायला तयार नव्हता.

१९५१ मध्ये आणखी एक सिनेमा काढला, त्याचं नाव होतं ‘हलचल’. त्याचा हिरो होता दिलीप कुमार आणि हिरॉईन नर्गीस आणि मग पुन्हा एकदा ‘मुघल-ए-आझम’ने मनात उसळी घेतली. त्याला नवा हिरो सापडला, दिलीप कुमार.

नर्गीस हिरॉईन म्हणून होतीच. पण, सगळ्या गोष्टी सहज घडणाऱ्या नव्हत्या. तोपर्यंत सोळा वर्षांची नर्गीस सर्वच बाबतीत खूप मोठी झाली होती. ती राज कपूरच्या प्रेमात होती आणि राज कपूर सांगेल तसं ती वागायची. तिने नाही म्हटलं.

दिलीप कुमार आणि नर्गीस यांची पडद्यावरची केमिस्ट्री कधीच जुळली नाही. त्यात दिलीप कुमार हा आपल्या भूमिकेचा खूप विचार करायचा. त्याला असं लक्षात आलं की, या सिनेमात आपल्याला वाव कमी आहे, कारण शेवटी कथानक अकबर आणि अनारकली यांच्याभोवती फिरतं. जे नाट्य आहे, ते त्या दोघांमध्ये घडत.

आसिफच्या प्रयत्नामुळे तो शेवटी तयार झाला. त्यावेळेला दिलीप कुमार आणि मधुबाला यांचं प्रकरण जोरात होतं म्हणून मधुबाला सिनेमात आली. सगळं छान होतंय असं वाटत असतानाच शशधर मुखर्जीने अत्यंत रेकॉर्ड वेळेमध्ये ‘अनारकली’ सिनेमा काढला. अनारकली सिनेमा ५० आठवडे चालला. खरंतर ५० आठवडे चालावं असं त्या सिनेमात संगीत सोडून काहीही नव्हतं. तो सिनेमा कशावर चालला असेल, तर सी. रामचंद्र यांचं संगीत, लतादीदींचा स्वर्गीय आवाज आणि बीना राय सुंदर दिसते.

लंडन टाइम्सने परीक्षणात लिहिलेलं होतं. ‘She looks divine and sings like an angel.’ त्या सिनेमामध्ये प्रदीप कुमार हा सलीम होता. प्रदीप कुमार एखाद्या पुतळ्यासारखा सुंदर होता; पण बस तेवढंच! त्याचा चेहरा कोरा कागद होता, त्यावर भाव कधी लिहिले जायचेच नाहीत; आणि जो नट अकबर झाला होता, तो या देशाचा शहेनशहा सोडा, एखाद्या कोळशाच्या दुकानाचा मालकसुद्धा नसता वाटला.

त्याच सुमारास कमाल अमरोहीने ठरवलं होतं की, मीनाकुमारीला घेऊन आपण सलीम-अनारकलीच्या कथेवर सिनेमा काढायचा. गंमत पहा, एका ठिकाणी ‘मुघल-ए-आझम’च्या चार लेखकांपैकी एक लेखक कमाल अमरोही होता, उरलेले तीन म्हणजे अमान उल्ला खान, एहसान रिझवी आणि वजाहत मिर्झा.

आसिफ चिडले, त्यांनी स्पष्टपणे कमाल अमरोहीला सांगितलं की, एक तर तू माझ्या सिनेमाचा लेखक राहा, नाहीतर सिनेमा काढ. दोन्ही गोष्टी एकाच वेळेला तुला करता येणार नाहीत. त्याने स्वतःचा उद्योग बंद केला. या सिनेमाला फायनान्स पुरवला होता सुप्रसिद्ध कन्स्ट्रक्शन कंपनी शापूर्जी पालनजीने. ह्या सिनेमामध्ये सेट्स खूप भव्य आहेत. पैसा अक्षरशः पाण्यासारखा खर्च केला गेला.

आसिफला शिश महाल तयार करून तिथे गाणं ठेवावंसं वाटलं. तो तयार करण्यासाठी दोन वर्षं गेली आणि त्या काळामध्ये पंधरा लाख रुपये खर्च झाला. अत्यंत महागडे असे रंगीत आरसे बेल्जियमवरून मागवण्यात आले आणि ती किंमत बघून पालनजी झोपले नाहीत.

तो महाल उभा राहिल्यानंतर आणखी एक प्रॉब्लेम असा झाला की, शूटिंग करताना त्या आरशांमुळे लाइट रिफ्लेक्ट व्हायला लागला. हा प्रश्न कसा सोडवायचा हा मोठा प्रश्न होता. मग त्यांच्यावर मेणाचा एक अत्यंत पातळ असा थर लावण्यात आला.

पालनजी एवढे चिडले की, त्यांनी सोहराब मोदीकडे हा सिनेमा सोपवायचं ठरवलं. आसिफ रडकुंडीला आले. त्यांनी सांगितलं की, मला काही शॉट शूट करू द्या, त्यांचे निगेटिव्हज मी लंडनला प्रोसेसिंगसाठी पाठवतो आणि काय रिझल्ट आहे तो पाहू या.

नशिबाने रिझल्ट खूप चांगला आला. त्या महालातलं ‘प्यार किया तो डरना क्या’ हे गाणं तुफान गाजलं. मधुबालाची त्या आरशांमधली हजारो प्रतिबिंबं पाहून इंद्रालासुद्धा सलीमचा हेवा वाटला, स्वर्गात अप्सरेला न्यूनगंड वाटला.

या सिनेमाची सुरुवात झाली होती तेव्हा दिलीप कुमार आणि मधुबाला यांचं प्रेम अत्यंत रंगात होतं; पण शूटिंग संपेपर्यंत दोघांमध्ये भांडण झालं. त्याच वेळेला मधुबालाला हृदयाचा त्रास सुरू झाला. तिचे वडील शूटिंगच्या वेळी त्रास देत म्हणून त्यांना पत्ते खेळण्यात गुंतवण्याची योजना आखली गेली.

एका माणसाला रोज एक हजार रुपये देऊन त्यांच्याबरोबर पत्ते खेळले जात. त्या माणसाला हरण्याची सक्त ताकीद दिली होती. जो एक फेमस शॉट आहे, त्याला पिसाचा शॉट म्हणतात, त्यात मधुबाला आणि दिलीप कुमार शहामृगाच्या पिसाआड प्रेम करतात.

तिथे बडे गुलाम अली खानचं गाणं हवं होतं. कारण मागे तानसेन गातो, ते चित्रपटसांठी गात नसत. त्यांना त्याकाळात दोन गाण्यांसाठी ५० हजार रुपये दिले गेले. त्या वेळी लता-रफी पाच हजार घेत. सगळं झाल्यानंतर दीड कोटीचा खर्च करून हा चित्रपट तयार झाला. मराठा मंदिर इथे प्रीमियर झालं. अख्खी इंडस्ट्री लोटली.

प्रीमियर झाल्यानंतर काहीजण असं म्हणायला लागले की, एवढा खर्च केला खरा; पण हा चित्रपट चालेल ? तोंडात सिगारेट धरून आसिफ उभा होता. त्याला मात्र खात्री होती, इतिहास घडणार. साठ आठवडे हा सिनेमा या देशातल्या विविध थिएटरमध्ये चालला.

तोपर्यंतचा तो सगळ्यात यशस्वी असा सिनेमा होता. त्याचा विक्रम नंतर अर्थात शोलेने मोडला. अलीकडे त्याच्यावर ब्रॉडवे स्टाइल सांगीतिक नाट्य बसवलं गेलं, तेही शापूर्जीने. आसिफ हा ‘मुघल-ए-आझम’साठी जन्माला आला आणि त्यानंतर जगातून निघून गेला... आणि अजरामर झाला.

स्वप्न पहाणं हे कदाचित सोप्पं असतं. सिनेमात प्रवेश केल्यापासून त्यांच्या डोक्यामध्ये एक कथा होती आणि ती कथा अर्थात ‘मुघल-ए-आझम’ची. सलीम आणि अनारकली यांची कथा. १९४५ मध्ये आसिफ दिग्दर्शक झाले आणि दिग्दर्शक झाल्यानंतर जो पाहिला सिनेमा काढला त्याचं नाव फूल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com