नैन लड जई है...

माणसाचा पहिला हुंकार हा आपल्या मातृभाषेतूनच; पण तिच्या स्थानिक स्वरूपातूनच उमटतो.
नैन लड जई है...
नैन लड जई है...esakal

डॉ. कैलास कमोद kailaskamod1@gmail.com

नैन लड जई है...

नैन लड जई है तो मनवा मा कसक हुई बे करी

प्रेम का छुटी है पटाखा तो धमक हुई बे करी

माणसाचा पहिला हुंकार हा आपल्या मातृभाषेतूनच; पण तिच्या स्थानिक स्वरूपातूनच उमटतो. ठेच लागली तर ‘आई गं’ असे शब्द मराठी माणसाच्या तोंडून उत्स्फूर्तपणे बाहेर पडतात, तद्वत् उत्तर भारतीय खेडूत तरुणाच्या मनात पहिल्यांदा प्रीतीची ठिणगी पडली तर जणू एखादा फटाका उंच उडून जोरदार आवाज करत फुटला अशी भावना त्याला होऊन ‘प्रेम का छुटी है पटाखा तो धमक हुई बे करी’ अशा भाषेत ती भावना तो व्यक्त करतो. प्रेमाचा पहिला अंकुर मनात फुटतो तेव्हा मनाची अवस्था अशी गमतीशीर होऊ लागते. कधी बसल्याजागी एकट्यालाच मनातल्या मनात हसू फुटतं, तर कधी मनातून कविता प्रसूत होऊ लागते. कधी मन गाणं गुणगुणायला लागतं, तर कधी उत्साहित होऊन लगबग हालचाली करू लागतं. गावात, रस्त्यात, जत्रेत, एकांतात असं कुठंही ‘ती’चं किंवा ‘त्या’चं स्मरण होऊ लागतं. बरं, असं काहीबाही होतंय ते सांगायचं तरी कुणाला आणि कसं सांगायचं? ‘ती’ला किंवा ‘त्या’ला थेट सांगायला मन लवकर धजत नाही; पण मनातली ही घुसमट प्रकट तर झालीच पाहिजे ना! नाहीतर प्रेमाचा फुटलेला अंकुरच कोमेजून जायचा.

नैन लड जई है...
Nashik News : कोट्यधीश माजी आमदार गावितांच्या संपत्तीत अल्पशी वाढ; 5 वर्षांत अवघ्या 13 लाखांची भर

हा ग्रामीण युवक आज आपल्या प्रेमाचं ‘गुपित’ चव्हाट्यावर आख्ख्या गावाला मोकळेपणानं ऐकवायला सिद्ध झाला आहे. आज त्यानं सगळा गाव जमा केला आहे. आपली सगळी दोस्तमंडळी बरोबर घेऊन नाचत-गात तो गावकऱ्यांसमक्षच आपलं प्रेम व्यक्त करणार आहे. ते ऐकवताना तो फारच उत्तेजित-आनंदित झाला आहे. इतका की, गाववालेही त्याच्या आनंदात सहभागी होऊन त्याच्या प्रेमप्रकटीकरणाचा उत्सव साजरा करत आहेत!

लागा गोरी गुजरिया से नेहा हमार

हुई गवा सारा चौपट मोरा रोजगार

‘अहो, तिच्या डोळ्याला डोळा काय भिडला, तर मला मनात कससंच होऊ लागलं. उरात माझ्या प्रेमाच्या फटाक्यानं धमाका उडवला. काही कामधंदा सुचेना. काळजात माझ्या कालवाकालव होत आहे.

नैन लड जई है...
Satara News : चारा छावण्यांऐवजी शेतकऱ्यांना थेट अनुदान ; लवकरच होणार कार्यवाही

हुई गवा मन मा मोरे तिरछी नजर का हल्ला

गोरी को देखे बिना निंदिया न आवै हम का

फाँस लगी है तो करेजवा मा खटक हुई बे करी

माझी तर झोपच उडाली आहे. तिचं रूपडं मी मनात कोरून ठेवलं तर मी काही पाप केलं का? प्रेमाच्या दुनियेत मला काहीच हक्क नाही का?’ असं काहीबाही तो युवक लोकांना विचारत-सांगत सुटला आहे...

आँख मिल जई है सजनिया से तो नाचन लगी है

प्यार की मीठी गजल मनवा भी गावन लगी है

झाँझ बजी है तो कमरिया मा लटक हुई बे करी

हे सगळं सांगण्याची त्याची तऱ्हाही मोठी रांगडी आहे. त्याची ग्रामीण भोजपुरी भाषा ऐकताना मजा वाटते. ‘प्यार की मीठी गजल मनवा भी गावन लगी है’ अशा ओळीतून भोजपुरी भाषेची मिठास समजते.

नैन लड जई है...
Latest Marathi News : दिवसभरात देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

‘मनवा’, ‘नाचन’, ‘हम का’ असे हिंदी शब्द भोजपुरी ढंगात लिहून गीतकार शकील बदायुनी यांनी गमतीदार शब्दरचना तर केली आहेच; पण त्याचबरोबर प्रेमाच्या कल्पनेनं हवेत तरंगणाऱ्या ग्रामीण तरुणाची मनोवस्था त्यांनी फार मजेशीरपणे लिहिली आहे.

शास्त्रीय संगीताबरोबरच उत्तर भारतीय लोकसंगीताचा प्रचंड अभ्यास असलेले संगीतकार नौशाद यांनी भोजपुरी शब्दरचनेला तशाच बाजाची चाल आणि संगीत दिलं आहे. ढोलक, सारंगी, पेटी, बासरी, सनई अशा भारतीय वाद्यांसह हे लोकसंगीत कानाला भावतं. इंटरल्यूडला सारंगीची सुरावट फारच मस्त. सगळ्या वाद्यांचा ताळमेळसुद्धा तितकाच मस्त.

नैन लड जई है...
Pune News : शिखरे यांच्या चित्राची आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात भूरळ

‘नैना जब लडी है तो भैया मन में कसक हुई बे करी’ या शेवटच्या पंक्तीला चाल अचानक बदलून वेगवान होते. वाद्यांचा ध्वनीही वाढतो. कारण, त्याला समोरच्या घराच्या ओट्यावर उभी असलेली नायिका दिसते. त्याच वेळी ‘मन ले गई रे....रामा कैसा जादू डाल के, कैसा जादू डाल के रे कैसा टोना मार के’ या पंक्ती आणखी वेगळ्या; पण वेगवान चालीत येतात. कोरसच्या तोंडी या शेवटच्या ओळी येतात. वाद्यांचा जोर वाढतो आणि जमलेल्या गावकऱ्यांकडून शिट्ट्यांची दाद मिळू लागते.

नैन लड जई है...
Solapur News : PM मोदींच्या सोलापुरातील सभेसाठी भाजपची जय्यत तयारी! मोहोळमधून जाणार सुमारे वीस हजार कार्यकर्ते

अशा संगीतयोजनेतून नौशाद यांनी गाण्याची रंगत खूप वाढवली आहे. कोरसचा जो वापर त्यांनी केला आहे तो अगदी दाद देण्याजोगा. महंमद रफी यांनी कमाल केली आहे. गाण्याचा वेग सांभाळत अभिनेत्याच्या ॲक्शननुसार विशिष्ट ठसक्यात शब्दांची फेक करत त्यांनी हे गाणं गायिलं आहे. सुरुवातीची तान, मध्येच येणारा ‘ताक धिनक धिन, ताक धिनक धिन’ हा तराणा आणि शेवटच्या ओळीत गाण्यानं पकडलेला वेग या सर्व ठिकाणी शब्दांना पाहिजे तसं वाकवून अचाट अशी शब्दफेक महंमद रफी यांनी केली आहे. नौशाद आणि रफी यांचं कॉम्बिनेशनच फार जबरदस्त होतं.

‘प्रेम की नगरी में कुछ हमरा भी हक हुई बे करी’ असं ठासून सांगताना नायक दिलीपकुमार हातातली काठी जमिनीवर उभी धरून आपटतो. तो प्रसंग छान आहे. गर्दीतले लोक उत्स्फूर्ततेनं शिट्ट्या वाजवतात. ती नैसर्गिक दाद. हे सगळे प्रकार पाहून नायिका वैजयंतीमाला लज्जित मुद्रेनं त्याला शेवटी दाद देते.

नैन लड जई है...
Dhule Drought News : पाणीटंचाईग्रस्त गावांचे कोणी श्रेय घेईल का? टंचाईग्रस्त गावांचा दर वर्षीच पाण्यासाठी लढा

दिलीपकुमारला ‘अभिनयाचं विद्यापीठ’ का म्हणतात ते या एकाच गाण्यातून लक्षात यावं; इतकी जबरदस्त अदाकारी त्यानं केली आहे. हातांच्या नजाकतदार हालचालींतून अभिनय व्यक्त करण्याची अजब साधना त्यानं साध्य केली होती. ती या गाण्यात पुरेपूर दिसते. प्रत्येक पंक्तीगणिक त्याच्या चेहऱ्यावरच्या हास्याचे भावसुद्धा बदलते आहेत हे आणखी विशेष. कमल हासन याच्यासारखं नृत्यलालित्य त्याच्याकडं नसेलही, तरीही या ग्रामीण ढंगाच्या नृत्यात त्यानं जे रंग भरले आहेत ते कमालीचे आकर्षक आहेत. पहिल्या इंटरल्यूडला सारंगीच्या सुरावटीवर त्यानं केलेला पदन्यास हा एक सुंदर नृत्याविष्कार आहे.

नैन लड जई है...
Nashik News : कोट्यधीश माजी आमदार गावितांच्या संपत्तीत अल्पशी वाढ; 5 वर्षांत अवघ्या 13 लाखांची भर

तोल जाता जाता सावरण्याची त्याची ॲक्शन नैसर्गिक वाटते. त्याच्याविषयी लिहावीत अशी आणखी अनेक सौंदर्यस्थळं या गाण्यात आहेत. राजेंद्रकुमार, मनोजकुमार, धर्मेंद्र यांच्यापासून ते अमिताभ बच्चन, शाहरुख खान यांच्यापर्यंतचे अनेक अभिनेते त्याला आपला आदर्श मानतात, ते किती योग्य आहे हे अशा वेळी लक्षात येतं. संगीताला साथ देणाऱ्या या गाण्याच्या अफलातून कोरिओग्राफीसाठी बी. हिरालाल या कोरिओग्राफरला दाद द्यावी लागेल. ग्रामीण समूहनृत्याचं उत्कृष्ट सादरीकरण त्यांनी दर्शवलं आहे. पार्श्वभूमीचं ते खेडं, ते ग्रामस्थ, त्या ग्रामीण ललना, त्यांचे पोशाख आणि त्यांचं समूहनृत्य असं सगळंच नेपथ्य उत्कृष्ट. भानू अथैया यांनी सर्वांनाच दिलेली ग्रामीण वेशभूषासुद्धा वास्तववादी. दिलीपकुमारचे पदन्यास, करन्यास, मुद्राभिनय आणि उत्कृष्ट कोरिओग्राफी यांतून जमून आलेलं असं हे मस्त गाणं.

‘गंगा जमना’ (१९६१) या सिनेमातलं या गाण्यातलं पार्श्वभूमीचं खेडेगाव कथानकानुसार, उत्तर भारतातलं दिसत असलं तरी नाशिकजवळ इगतपुरी तालुक्यात मुंबई हायवेवरच्या वाडीवऱ्हे या गावाच्या परिसरात गाण्याचं आणि सिनेमाचं संपूर्ण चित्रीकरण झालं होतं. दिग्दर्शक होते नितीन बोस. निर्माता आणि कथालेखक स्वत: दिलीपकुमारच होते. अनेक वर्षांनंतर सलीम-जावेद यांनी लिहिलेल्या अमिताभ बच्चन-शशी कपूर यांच्या ‘दीवार’चं कथासूत्र ‘गंगा’ आणि ‘जमना’ या दोन भावांच्या कथेवरच आधारित होतं.

(लेखक हे हिंदी सिनेगीतांचे अभ्यासक-समीक्षक, तसंच ‘गाने अपने अपने’ या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत. ‘गुनगुना रहे है भँवरे’ हे याच विषयावरचं पुस्तक त्यांच्या नावावर आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com