शिवराज आणि बालवीर स्मरणाआड न जाणारे गीत

Marathi Poet Vaman Pathak
Marathi Poet Vaman Pathakesakal

वामन भार्गव पाठक (१९०५-१९८९) यांची ‘शिवराज आणि बालवीर’ ही कविता साऱ्यांना खात्रीने आठवत असेल. वामन भार्गव पाठकांनी पुण्याच्या वाडिया महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून सुमारे एकोणतीस वर्षे सेवा दिली. सोबतच कादंबरीकार, समीक्षक म्हणूनही त्यांनी लेखन केले. पण कवी म्हणून त्यांना मिळालेली ओळख ही अधिक मोठी होती. त्यातही विशेषत्वाने याच कवितेचा वाटा अधिक होता. आचार्य अत्रेंसारख्या अष्टपैलू साहित्यिकासही या कवितेने मोह पाडला होता. या कवितेवरूनच कवीच्या कवित्वशक्ती अन् प्रतिभेविषयी आपण जी अटकळ बांधली होती ती खरी ठरली, असे मत त्यांनी कवीच्या आशादीप काव्यसंग्रहाच्या प्रस्तावनेत नोंदविलेले आहे. (saptarang Latest Marathi Article by Dr neeraj deo on marathi poetry of poet vaman pathak nashik news)

Marathi Poet Vaman Pathak
शिकारीवरील बंदी का उठवावी?

कवीची काव्यविषयाकडे पाहण्याची दृष्टी गंभीर असून, वेचक आहे. त्याचेच प्रतिबिंब त्याच्या प्रवासी, मानवता, ओढणी या खंडकाव्यातून दिसते. कवीची स्फुट कविताही त्याला अपवाद नाहीत. आपल्या एका कवितेत प्रियकराची प्रेमाविषयाची उदासीनता दाखविताना कवितेतील प्रेयसी म्हणते, ‘तुम्ही माझ्याकडे पहावे, प्रेमात पडावे म्हणून मी तुम्हाला आवडणाऱ्या एकेक गोष्टी करत गेले, पण तुमची,

गंभीर वृत्ती परी न याने अपुली ढळली काही

आणि त्याची अशी गंभीर वृत्ती अनुभवून तिचे प्रेम घटण्याऐवजी वाढतच जाते. कारण तेही गंभीरच आहे. म्हणून ती ठणकावून सांगते-

वरपांगी न च तुम्ही दाविले प्रेम कधी असलेले
म्हणून माझे मानस आहे तुमच्यावर बसलेले।

कवीच्या ओळी सच्च्या प्रेमाची ग्वाही देताना मराठी साहित्यात प्रेम कवितेचे आगळेवेगळे दर्शन घडवितात. प्रेम काव्यात आणि काव्यातील प्रेमात गंभीर असलेला कवी ऐतिहासिक अन् राष्ट्रीय काव्यात कसा असेल बरे? रसिका! चल तर मग तुझ्या नि माझ्या तीनेक पिढ्यांना कवीच्या ज्या काव्याने ओढ लावली त्याच शिवरायाच्या सावळ्याच्या कवितेत. कवितेच्या आरंभीच्या टीपेत कवी सांगतो, कि मी परत येईपर्यंत या शीवेवरून कोणाही स्वारास जाऊ देऊ नकोस’, अशी आज्ञा सावळ्यास देऊन महाराज सीमेच्या रक्षणास त्यास ठेवतात. थोड्या वेळानंतर एक अपरिचित स्वार तेथे येतो. त्याला शीवेवरच अडवत छोटासा सावळ्या हटकतो,

Marathi Poet Vaman Pathak
ती, समाज आणि कायदा...!

खबरदार जर टांच मारुनी जाल पुढे,
चिंधड्या-उडविन राइ राइ एवढ्या!

पाहा, काय हिंमत आहे या पोरात, मोठ्या स्वाराला तो खबरदारीचा आदेश देतो आणि आज्ञा मोडली तर चिंधड्या उडविण्याची धमकी देताना विचारतो, ‘तुम्ही कुठल्याही गावचे पाटील असा, पण ही शीव शिवरायाच्या परवानगीशिवाय ओलांडता येणार नाही. मला लहान पोर समजून हसण्यावारी घेऊ नका कारण-

हा मर्द मराठ्याचा मी बच्चा असे
हे हाडही माझे लेचेपेचे नसे
या नसांनसांतून हिंमतबाजी वसे

त्याच्या या बोलण्यावर तो योद्धा स्वार त्याला म्हणतो, ‘खरेतर तू शेतात जाऊन छोटी-मोठी कामे करावीस. तुला हा ताठा शोभत नाही. एवढ्या बढाया कशाच्या जोरावर मारतोस? तुझ्याकडे भाला, बरची असे एखादे शस्त्र तरी आहे का? हे बघ माझे तळपते अन् अणकुचीदार शस्त्र खबरदार जर मला अडवशील तर?’

हेही वाचा : दिव्यांग खेळाडूंची खडतर 'पाठशाळा'

Marathi Poet Vaman Pathak
अजोड सत्यनिष्ठा

त्याच्या या उत्तराने किंचितही न घाबरता, तो पुढे सरसावून म्हणतो, ‘तुम्ही भली मोठी दाढी वाढविलेली असली तरी बायकी वीर आहात. तुमच्यासारखे कित्येक आमच्या शिवबाने भर रणांगणात लोळवलेत. मी त्यांचा इमानी चेला आहे. मी एक पाऊलही तुम्हास पुढे जाऊ देणार नाही.’ असे गर्जत तो त्वेषाने उभा ठाकला. त्याचे वदन रागाने लाल-लाल झाले आणि तसा तो स्वार का कोणजाणे मंद स्मित करू लागला. त्या बाळाच्या डोळ्यांत त्वेषाने पाणी चमकू लागले तसा तो स्वार प्रसन्न होत खुलू लागला. अचानक आपले त्या स्वाराचे सोंग टाकत शिवराज सावळ्याला म्हणाले,

आहेस इमानी माझा चेला खरा
चल इनाम घे हा माझा शेला तुला

Marathi Poet Vaman Pathak
चीन कोरोनाग्रस्तच का?

आणि आग्रह करत म्हणतात,

म्हण ते पुन्हा एकदा म्हण -
खबरदार जर टांच मारुनी जाल पुढे,
चिंधड्या- डविन राइ राइ एवढ्या!


पण सावळ्या लाजून काहीच न बोलता मूक राहतो.
या कवितेत सावळ्या स्वत:ला आणि महाराज त्याला नौकर नाही चेला म्हणतात. हे खूप सूचक आहे. नौकर जन्मभर नौकरच राहतो, तर चेला गुरुत्वाला पोचण्याचा अधिकार बाळगतो. ज्याकाळात राजाला मालक अन् सेवकाला गुलाम मानले जाई त्याकाळात चेल्याचे नाते निर्माण करीत स्वराज्याचे व्रतच महाराज पुढील पिढ्या न् पिढ्यात संक्रमित करत होते, हे कवीने अचूक चितारले.

नीट पाहिले तर केवळ तीन कडव्यात कवीने एक नाट्यमय कथानक सुरेखपणे रेघाटले. त्यातही एक गंभीर प्रसंग रेखाटता रेखाटता शिवबाच्या वेशांतराने फसलेला इमानी पण भोळाभाबडा सावळा रेखाटत एक मिश्किल भरली आहे. ती चित्तवेधक आहे. शिवाय शेवटच्या पंक्तीत धृपद शिवरायाच्या तोंडी घालत जी अर्थछटा निर्माण केली आहे ती लाजवाब आहे. त्यामुळेच हे गीत पिढ्या न् पिढ्या रसिकांना खुणावते आहे.

Marathi Poet Vaman Pathak
जगण्याचे तत्त्वज्ञान समृद्ध करणारे ज्ञानपीठ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com