सह्याद्रीचा माथा : गोदामाई अशीच निर्मळ, प्रवाही राहो !!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिक दौऱ्यानिमित्ताने नाशिक शहराला अलौकीक अशी झळाळी प्राप्त झालेली होती...
saptarang latest marathi article by dr rahul ranalkar on May Godamai remain pure and flowing nashik jalgaon
saptarang latest marathi article by dr rahul ranalkar on May Godamai remain pure and flowing nashik jalgaonesakal

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिक दौऱ्यानिमित्ताने नाशिक शहराला अलौकीक अशी झळाळी प्राप्त झालेली होती. अवघ्या काही तासांमध्ये शहराचे रूपडे पालटल्याचे नाशिककरांनी याची देही याची डोळा अनुभवले.

पवित्र रामतीर्थावर येऊन पंतप्रधान जलपूजन, आरती करणार आणि त्यासोबतच प्रभू श्री काळारामाचे दर्शन घेणार या ऐनवेळीच्या कार्यक्रमामुळे प्रशासकीय यंत्रणांची मोठीच धावपळ उडाली होती. मात्र फारच कमी वेळात गोदाघाट चकचकीत करण्यात आला.

अत्युच्च दर्जाची स्वच्छता करुन निर्मळ, प्रवाही गोदामाई डोळ्यात साठवताना नाशिककर कृतकृत्य झाले. गोदामाई अशीच निर्मळ, प्रवाही वर्षभर का राहू शकत नाही? असा प्रश्न यानिमित्ताने आता उपस्थित केला जात आहे. तो नक्कीच संबंधितांच्या डोळ्यात अंजन घालणारा ठरावा... (saptarang latest marathi article by dr rahul ranalkar on May Godamai remain pure and flowing nashik jalgaon)

गोदामाई ज्या ठिकाणी दक्षिणवाहिनी होते, तो परिसर म्हणजे पवित्र रामतीर्थ. धार्मिक, आध्यात्मिकदृष्ट्या या संपूर्ण परिसराचे मोठे महत्त्व आहे. देशभरातून दररोज हजारो लोक या परिसरात येत असतात.

असंख्य लोक या जलधारेत स्नान देखील करतात. एक मोठे धार्मिक महत्त्व असलेले हे ठिकाण आहे. देशबारातील जनतेच्या श्रध्दा त्याच्याशी जोडल्या गेलेल्या आहेत.

त्यामुळे रामतीर्थाची नियमित स्वच्छता व्हावी आणि हा परिसर येणाऱ्याला मनःसांतीची अनुभूती देणारा ठरावा या गैर काहीच नाही. गोदापात्राची नियमित स्वच्छता व्हावी ही भाविकांची अपेक्षा मात्र महापालिका प्रशासन आजपर्यत पूर्ण करू शकलेले नाही.

अनेकदा इथल्या पाण्याला प्रचंड घाणीचा दर्प येतो, असा अनेकांचा अनुभव आहे. त्यामुळे परराज्यातून येथे मोठ्या भावनेने आलेले लोक नाके मुरडतच माघारी जातात, ही आपल्यासाठी नक्कीच भूषणावह बाब नाही. आपण गोदावरी आणि गंगेची तुलना करतो.

दोन्ही नद्यांचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण आहेत, पण निदान जिथे शहर वसलेले आहे, त्याठिकाणी तरी पावित्र्य जपले जावे. यासाठी अयोध्या आणि वाराणसीला करण्यात आलेल्ये प्रयोग पाहण्यासारखे आहेत.

पंतप्रधानांच्या दौरा म्हणून करण्यात आलेली स्वच्छता जरी नियमित झाली तरी दक्षिणगंगेचे धार्मिक महत्त्व टिकण्यास मोठा हातभार लागेले.

saptarang latest marathi article by dr rahul ranalkar on May Godamai remain pure and flowing nashik jalgaon
शैलीदार आविष्कार!

नाशिकमध्ये राहत असूनही येथील नागरिक रामतीर्थावर जावून स्नान करण्यास धजावत नाहीत. बऱ्याच ठिकाणी ड्रेनेजचे पाणी गोदामाईत येवून मिळते. या परिस्थितीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न होत आहे.

मात्र त्याची तीव्रता पाहिजे तेवढी नक्कीच नाही. दक्षिण गंगेवर अपार श्रद्धा असल्यामुळे नाशिकमध्ये सर्वाधिक भाविक दक्षिणेतून येतात. या मंडळींना गोदाघाटावरील अस्वच्छता पाहून अत्यंत वाईट वाटते.

पंतप्रधान मोदी यांच्या आगमनाच्या दोन दिवस आधीपासून करण्यात आलेली स्वच्छता एवढी जबरदस्त होती की कागदाचा एक तुकडाही रामतीर्थ परिसरात नव्हता.

काशी एवढेच महत्त्व दक्षिण काशीला आहे. त्यामुळेच नाशिक नगरी ही कुंभनगरी देखील आहे. काशीप्रमाणे मॉडेल इथे करायचे झाल्यास त्यासाठी प्रचंड राजकीय आणि प्रशासकीय इच्छाशक्ती लागणार आहे.

आपण ते करु शकतो, हे पंतप्रधानांच्या दौऱ्यात प्रशासनाने दाखवून दिले आहे. पंचवटीमधील अतिक्रमणांचा प्रश्न देखील गंभीर आहे. या दौऱ्यापूर्वी तीन वेळा पंतप्रधान मोदी नाशिकमध्ये आलेले आहेत.

मात्र, इच्छा असूनही ते रामतीर्थ आणि काळाराम मंदिरात दर्शन घेऊ शकले नव्हते. त्याचे प्रमुख कारण म्हणजे पंचवटीतील अरुंद रस्ते.

या विषयावर मार्ग काढायचा झाल्यास त्यासाठी राजकीय नेतृत्त्वाप्रमाणे प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मनोधैर्य पणाला लागणार आहे. नागरिकांनी देखील या प्रयत्नांना सकारात्मक साथ देणे क्रमप्राप्त आहे.

saptarang latest marathi article by dr rahul ranalkar on May Godamai remain pure and flowing nashik jalgaon
भारतीयांच्या परदेशगमनाचं अपयश कोणाचं?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com