एज्यु कॉर्नर : जाणून घ्या, कशा असाव्यात आंतरराष्ट्रीय शाळा...

K. S. Azad
K. S. Azadesakal

लेखक : के. एस. आझाद

शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. सध्याच्या युगात शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. सध्या तरी व येणाऱ्या काही वर्षात शिक्षणाला काहीही पर्याय नाही.

उच्च दर्जाचे शिक्षण घेणे, जगात काय चालू आहे व भविष्यात कशात संधी आहेत, त्यादृष्टीने शिक्षण घेणे आवश्यक आहे. यात शालेय शिक्षण हा संपूर्ण शिक्षणाचा पाया होय.

आपल्या पाल्यासाठी आपण शाळा निवडताना आपण अत्यंत सजग असतो. इंटरनॅशनल स्कूल हा सध्या शिक्षणाच्या बाबतीत सर्वाधिक लोकप्रिय प्रकार मानला जातो. अलीकडच्या काळात बहुतेक पालक आपल्या मुलाला इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रवेशास प्राधान्य देतात.

पण नेमके इंटरनॅशनल स्कूल म्हणजे काय हे समजून घेणे आवश्यक आहे. नुसते नाव इंटरनॅशनल स्कूल असून चालत नाही. तर त्यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा दिल्या गेल्या पाहिजे.

जगात काय सध्या चालू आहे शिक्षणाच्या बाबतीत त्यासंबंधीचा अभ्यासक्रम ऍक्टिव्हिटी या सर्व आहेत की नाही ते आपण तपासून घेणे गरजेचे आहे. अन्यथा आपल्याला प्रवेश घेतल्यानंतर मनस्ताप सहन करावा लागतो.

आंतरराष्ट्रीय शाळांमध्ये प्रात्यक्षिक अनुभवावर आधारित शिक्षणावर जास्त भर दिलेला असतो. पालकांनी संबंधित शाळा आंतरराष्ट्रीय असल्याची खात्री करूनच तेथे मुलांना प्रवेश घेणे संयुक्तिक ठरते. शाळेच्या नावात ‘इंटरनॅशनल’असा शब्द पाहून अनेक पालक मुलांना अशा शाळांमध्ये प्रवेश घेतात.

सर्वसाधारणपणे प्रत्येक घरामध्ये लहान मूल एक दोन वर्षांचे झाले, की त्याच्या शाळा प्रवेशाची वेध लागतात. त्याबद्दल घरात चर्चा सुरू होते. घरातील प्रत्येक सदस्य आपापल्या शैक्षणिक कौशल्य, अनुभव व वयानुसार वेगवेगळे पर्याय सुचवीत असतो.

सर्व घरातच या प्रवेशाचे वेध लागलेले असतात. असं म्हणतात, की मूल जन्माला येण्यापूर्वीच त्याच्या शाळेची चर्चा घरांत सुरू होते. यातील विनोदाचा भाग सोडला तर खरोखरच अशी परिस्थिती नसते, असं आपण ठामपणे म्हणू शकत नाही.

K. S. Azad
बिनीचे कार्यकर्ते

पूर्वीपेक्षा हल्ली पालक मुलांच्या शिक्षणाबाबत जरा जास्त जागरुक झालेले आहेत, असं वाटण्याजोगी परिस्थिती दिसून येते. शाळा निवडीसाठी अनेक पातळ्यांवर पालकांचे विचार विनिमय सुरू होतात.

पहिला चर्चेचा विषय असतो ते माध्यम कुठले? मग माध्यमाबाबत जर इंग्रजी हे नक्की असेल तर बोर्ड कुठले? किंवा कुठल्या बोर्डाची शाळा छान आहे? त्याप्रमाणे शाळांमध्ये अर्ज भरण्याची तयारी सुरू होते.

शाळा चांगली याबाबत मात्र पालकांच्या समोर मुख्य जोर असतो तर तो जी शाळा मुलांची तयारी चांगली करून घेईल ती उत्तम शाळा होय. तयारी अर्थातच लिहिणे, वाचणे हे प्रामुख्याने आले.

पालक म्हणून प्रत्येकाची इच्छा असते, की आपल्या मुलाने शक्य तितक्या मोठ्या वातावरणात सकारात्मक शिकण्याचा अनुभव घ्यावा.

सध्या आंतरराष्ट्रीय शाळा अधिक लोकप्रिय होत आहेत. वाढत्या ग्लोबलायझेशनमुळे समाजाच्या गरजांशी जुळवून घेतलेल्या त्यांच्या मनोरंजक अभ्यासक्रमामुळे पालक आणि मुले इंटरनॅशनल स्कूलकडे आकर्षित होत आहेत.

बहुसांस्कृतिक वातावरण सहिष्णुता विकसित करण्यासाठी आणि इतर संस्कृती बद्दलचे ज्ञान वाढवण्यासाठी तसेच आकार देण्यासाठी अनुकूल इंटरनॅशनल स्कूल आहेत.

इंटरनॅशनल स्कूल म्हणजे काय त्याचे काय पॅरामिटर आहे? हे लक्षात घेणे आवश्यक आहे. जगाची भाषा इंग्रजी आहे. पण त्याचबरोबर इतरही काही भाषांचे जगावर अनेक ठिकाणी प्रभुत्व आहे. उदाहरणार्थ फ्रेंच, जपानी, स्पॅनिशसारख्या परदेशी भाषा शिकविण्याची व्यवस्था आवश्यक आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

K. S. Azad
सांजवेळ

गुणवत्ताप्राप्त शिक्षक वर्ग हा शाळेचा आरसा असतो. ही अत्यंत महत्त्वाची बाब होय. शिक्षक हे प्रशिक्षित किंवा किमान मराठी, हिंदी, इंग्रजी या तिन्ही भाषेवर प्रभुत्व असणारा डीएड, बीएड पदवीधारक असावा.

आपण किती वेळ शिकविले, त्यापेक्षा आपण शिकवल्यापैकी किती विद्यार्थ्यांना कळाले, अशी भावना जपणारा शिक्षक वर्ग असला पाहिजे. तेव्हाच खऱ्या अर्थाने योग्य शिक्षण देण्याचा उद्देश सफल होऊ शकतो. शाळेतील जेवणाची, डबा खाण्याची उत्तम सोय असणे उपयुक्त ठरते.

आजच्या युगात विद्यार्थ्यांचे आई-वडील दोघेही नोकरी अथवा व्यवसायात व्यस्त असतात. त्यामुळे मुलांचा जेवणाचा डबा बनविणे शक्य होत नाही. विशेष करून मॉर्निंग शिफ्टमध्ये नोकरीस असलेल्या पालकांना मुलांना डबे देणे जिकीरीचे ठरते.

त्यामुळे डायनिंगची व्यवस्था इनहाऊस इंटरनॅशनल स्कूलमध्ये अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी प्रशस्त डायनिंग हॉल, स्वतंत्र हायजिनिक किचन, स्वच्छता, सकस अन्न याची नियमितपणे काळजी घेतली जाणे अपेक्षित असते. 

सध्या जागेची सर्वत्र अडचण आहे. त्यामुळे अनेक शाळांना खेळाची मैदाने नाहीत. इंटरनॅशनल स्कूल व ग्राउंड हा शाळेचा एक अविभाज्य घटक आहे. मुलांना डिजिटलायझेशनच्या युगातही मुलांना मैदानी खेळ व ग्राउंडवर नियमित वर्कआउट हे आवश्यक आहे.

K. S. Azad
निष्ठावंत जनसेवक

त्यामुळे प्रशस्त ग्राउंड आवश्यक आहे. जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यासाठी अभ्यासाव्यतिरिक्त अनेक बाबी व्यक्तिमत्व विकासात आवश्यक आहेत.

कला, क्रीडा, संस्कृती रोबोटिक, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, फार्मिंग, जर्नलिझम, हॉर्स रायडिंग  प्रत्येक विद्यार्थ्यांची आवड त्यांचा कल लक्षात घेऊन त्यांना त्या-त्या क्षेत्रात अधिकाधिक पारंगत करणे व यासाठीची आवश्यक असणारी यंत्रणा तेथे राबविणे तीही योग्यपणे आणि विनाखंड हे आंतरराष्ट्रीय स्कूलचे मानक होय.

विद्यार्थ्यांची सुरक्षितता हा मुद्दा देखील महत्त्वाचा ठरतो. इंटरनॅशनल स्कूल उभारताना सर्वांत महत्त्वाचा घटक म्हणजे जागतिक दर्जाचे इन्फ्रास्ट्रक्चर असणे आवश्यक आहे. मग यात प्रत्येक स्कूलशी संबंधित प्रत्येक बाबींमध्ये इंटरनॅशनल दर्जा असलाच पाहिजे.

सीसीटीव्ही संपूर्ण स्कूल कॅम्पसच्या कक्षेत असायला हवेत. आयटी रूम, अपडेटेड कॉम्प्युटर्स, स्कूलमधील सपोर्टिंग स्टाफ देखील महत्त्वाचा ठरतो. प्रत्येक कॉरिडोरमध्ये सपोर्टिंग स्टाफ, हाऊसकीपिंग असणे आवश्यक आहे.

 इंटरनॅशनल स्कूल म्हटलं, की इन्फ्रास्ट्रक्चर आलं. यात प्रामुख्याने शाळेची इमारत, ऑफिस, क्लासरूमचा समावेश होतो. या कन्स्ट्रक्शनमध्ये कुठलीही तडजोड केलेली नसावी. रुंद जिना, प्रशस्त क्लासरूम, वॉशरूम, ऊन-वारा-पाऊस या तिन्ही ऋतूमध्ये विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही, अशी रचना करण्यास सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे.

(लेखक क्लिफोर्ड इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक आहेत.)

K. S. Azad
‘सारस’ची अनोखी प्रेमकथा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com