दृष्टिकोन : फार्मसी क्षेत्रात रोजगाराच्या अमर्याद संधी

Rajaram Pangavane
Rajaram Pangavane esakal

लेखक : राजाराम पानगव्हाणे

सर्वच शिक्षण शाखांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. यामध्ये अधिकाधिक नवनवीन संशोधन समोर येत आहे. जगाच्या सध्याच्या परिस्थितीनुसार अनेक नवीन क्षेत्र करियरसाठी निर्माण होत आहेत.

तर काही पूर्वीच्या शिक्षण शाखांमधील अभ्यासक्रमांनाही कोरोना कालावधीनंतर प्रचंड महत्त्व प्राप्त झालेले आहे. फार्मसी हे आरोग्य क्षेत्राशी संबंधित असलेल्या क्षेत्रात आगामी काळात मोठ्या करिअरच्या संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहेत.

या क्षेत्राचा मागोवा घेत भविष्याचा कल ओळखण्यासाठी हा प्रपंच.... (saptarang latest marathi article by rajaram pangavane on Unlimited employment opportunities in field of pharmacy nashik news)

Rajaram Pangavane
दणदणाटाची धुंदी!
फार्मसी
फार्मसी esakal

कोरोनाच्या संसर्गामुळे संपूर्ण जग अभूतपूर्व संकटात सापडले होते. या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी प्रशासनाबरोबरच सर्वांत मोठा वाटा अथवा सर्वांत मोठे योगदान असेल तर ते वैद्यकीय क्षेत्राचे.

आरोग्य सेवा पुरवणाऱ्या सर्वच घटकांनी जीवाचे रान करून ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले. एखाद्या आजारावरील अचूक औषध उपलब्ध असणे किती महत्त्वाचे आहे, हे जगाने अर्थात आपण सर्वांनी पाहिले.

याच वैद्यकीय क्षेत्रातील मेडिकल नंतरची सर्वांत महत्त्वाची शाखा म्हणजे औषध निर्माण म्हणजेच फार्मसी होय. यामध्ये विद्यार्थ्यांना औषधांबद्दलचे ज्ञान दिले जाते. विद्यार्थ्याला औषधे कशी तयार केली जातात. त्यांची विक्री कशी केली जाते, ती उपचार करण्यासाठी कशी वापरली जातात हे प्रामुख्याने शिकवले जाते.

वैद्यकीय व्यतिरिक्त फार्मसीशी संबंधित सॉफ्टवेअरचे ज्ञान सुद्धा दिले जाते. कोरोनामुळे या क्षेत्रात प्रचंड करिअरची संधी निर्माण झालेली आहे. फार्मसी क्षेत्रातील एक अतिशय लोकप्रिय डिप्लोमा कोर्स आहे, ज्याचा पाठपुरावा मोठ्या संख्येने विद्यार्थी करत असतात.

हा कोर्स सरकारी अथवा खासगी महाविद्यालयातून पूर्ण करता येतो. पॅरामेडिकल क्षेत्रात नोकरी करण्यासाठी ‘एमबीबीएस’ डॉक्टर म्हणून करिअरची सुरुवात करणे आवश्यक नाही. तुमच्याकडे नोकरी किंवा व्यवसाय सुरू करण्याचा फार्मसीच्या माध्यमातून योग्य पर्याय आहे.

फार्मसी गेल्या काही वर्षांपासून औषधी व्यवसाय आणि संशोधन या दोन्ही क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. सर्वांत चांगली गोष्ट म्हणजे सोप्या नोकरीसाठी फार्मसी डिप्लोमा मिळवणे ही एकमेव आवश्यकता आहे. फार्मसीच्या सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रात रोजगाराच्या अमर्याद संधी उपलब्ध आहेत.

Rajaram Pangavane
गोडवा कडेपूरच्या कॉफीचा!

जगभर नोकरीच्या संधी

औषध विक्री व मार्केटिंग, आरोग्य विमा संरक्षण, बिझनेस ॲनालिस्ट, मार्केट सर्वे यासारख्या खासगी क्षेत्रात देखील फार्मसीच्या माध्यमातून संधी उपलब्ध आहेत. कोरोनानंतर संपूर्ण जगात व आपल्या देशात आरोग्याशी संबंधित असलेल्या सर्व क्षेत्राच्या विकासासाठी विशेष लक्ष देत आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने खूप लक्षणीय बदल होत आहेत.

यात मुख्यतः औषध संशोधन निर्मिती व औषधांचा पुनर्वापर यावर विशेष लक्ष सकारात्मक विस्तार व विकास होण्याचे संकेत मिळत आहेत. म्हणूनच येणाऱ्या काळात ज्ञान व कौशल्य असणाऱ्या फार्मसी विद्यार्थ्यांना रोजगाराच्या मोठ्या संधी जगभरात निर्माण होत आहे.

फार्मास्युटिकल इंडस्टी

संशोधन आणि विकास औषध शोध, फॉर्म्युलेशन अँड डेव्हलपमेंट, क्वालिटी कंट्रोल अँड क्वालिटी अॅश्युरन्स, बायोअॅनॅलेटिकल, बायोटेक्नॉलॉजी, फार्माकोलॉजी, टेक्नॉलॉजी ट्रान्सफर, नवीन औषध शोध संशोधन, प्रक्रिया व विकास, विश्‍लेषण आणि चाचणी, पायलट स्केल उत्पादन असा फार्मसीचा विस्तार आहे.

विविध मोठ्या राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष अशी मोठी पदे या कोर्सनंतर, प्रावीण्य मिळविल्यानंतर प्राप्त करता येतात. याचसोबत उपाध्यक्ष, सरव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, वरिष्ठ संशोधन वैज्ञानिक, संशोधन वैज्ञानिक, संशोधन वैज्ञानिक, प्रशिक्षणार्थी आदी पदे देखील आहेत.

उत्पादन क्षेत्रातही संधी

मॅन्युफॅक्चरिंग व पॅकेजिंग क्षेत्रात उत्पादन पर्यवेक्षक / अधिकारी, पीओ - वरिष्ठ पीओ, फॉर्म्युलेशन अँड प्रोसेस डेव्हलपमेंट डिपार्टमेंटही मोठ्या संधी देते.

फार्माच्या या क्षेत्रात ज्या उद्योगांमध्ये बल्क औषधे, इंटरमिजिएट्स किंवा फॉर्म्युलेशन आणि डोसेज फॉर्म, रक्‍त आणि प्लाझ्मा उत्पादने, जैविक आणि जैवतंत्रज्ञान उत्पादने, पशुवैद्यकीय औषधे, सौंदर्यप्रसाधने, वैद्यकीय उपकरणे आणि मशिन, दंत उत्पादने, साबण, पर्फ्युमरी, न्यूट्रास्युटिकल या देखील संधी उपलब्ध होतात.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Rajaram Pangavane
‘वयम्’ला चार चांद!

विविध पदांवर मोठी संधी

विक्री आणि विपणन (सेल्स अँड मार्केटिंग) उत्पादन व्यवस्थापन, प्रशिक्षण, मार्केट संशोधन हा विभाग फार्मास्युटिकल विक्री कोणत्याही प्रक्रियेच्या उत्पादनापासून ते ग्राहकांच्या विक्रीच्या प्रक्रियेपर्यंत अगदीच वेगळी असते.

सर्व विक्रींपैकी, फार्मास्युटिकल विक्री ही सर्वांत फायदेशीर आणि चांगल्या पगाराची मानली जाते. व्हॉइस प्रेसिडेंट, जनरल मॅनेजर अशी पदे असतात. नॅशनल सेल्स मॅनेजर, झोनल सेल्स मॅनेजर, रिजनल सेल्स मॅनेजर, एरिया सेल्स मॅनेजर / डिस्ट्रिक्ट सेल्स मॅनेजर, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह मॅनेजर मॅनेजमेंट आदी पदांवर देखील संधी मिळू शकते.

फार्मासिस्टची कामे अशी

नवीन औषधांची निर्मिती करणे, जी औषधे आहेत त्यांत काळानुसार बदल / विकास करणे आणि औषधांचे वितरण आदी कामे या क्षेत्रातील पदवीधर म्हणजे फार्मसी ग्रॅज्युएट करतात. आपल्या आजारांवर डॉक्टर आपल्याला औषधे देतात.

याच औषधांचे उत्पादन करणे, औषधांची गुणवत्ता तपासणे आणि सांभाळणे, औषधे बाजारात आणण्यापूर्वी प्रयोगशाळेत शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तपासण्या करणे ही सर्व कामे फार्मासिस्ट करत असतो.

फार्मसीतून करिअरच्या संधी

बीफार्म केलेल्या विद्यार्थ्यांना हेल्थ सिस्टम फार्मासिस्ट, हॉस्पिटल फार्मासिस्ट, कम्युनिटी फार्मासिस्ट, इंडस्ट्रिअल फार्मासिस्ट, रिटेल फार्मासिस्ट आणि रिसर्च फार्मासिस्ट म्हणून काम करता येते.

Rajaram Pangavane
सेवाभावी ‘सेवा कुटीर’

क्लिनिकल केअर योजना विकसित करणे, प्रतिकूल औषधोपचारांच्या घटनांचा तपास करणे तसेच असाध्य आजारांविषयी लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचे काम क्वालिटी एश्युरन्स म्हणून काम करणारे फार्मसी पदवीधर विद्यार्थी करतात.

औषधे नियामक मंडळाच्या नियमांनुसार गुणवत्तापूर्ण औषधांची निर्मिती होत आहे, की नाही हे पाहण्याचे काम क्वालिटी कंट्रोलर म्हणून काम करणारे फार्मसी पदवीधर करतात.

बायो इक्विव्हॅलन्स, बायोअ‍ॅव्हॅलिबिलिटी, सेंट्रल लॅबोरेटरीज यासारख्या ठिकाणी क्लिनिकल ट्रायल्स, क्लिनिकल रिसर्च, इन्व्हेस्टिगेशन, टेक्लिनिल रायटर्स आदी पदे फार्मसी ग्रॅज्युएट्स करतात.

शैक्षणिक पात्रता

फार्मसीचा कोर्स करण्यासाठी पीसीएम/बी विषय घेऊन बारावी सायन्स पास असणे आवश्यक आहे. या क्षेत्राचा पाया कॉलेजच्या सुरुवातीच्या वर्षातच घातला जातो. अकरावी-बारावी (सायन्स) ला असणाऱ्या बायोलॉजी आणि केमिस्ट्री या विषयांच्या अभ्यासाचा फायदा पुढे जाऊन फार्मसीचा अभ्यास करताना होतो.

फार्मसीमध्ये डिप्लोमा इन फार्मसी आणि बॅचलर इन फार्मसी हे दोन प्रकारचे (डिप्लोमा आणि डिग्री) कोर्स उपलब्ध आहेत. सरकारी आणि खाजगी संस्थांमध्ये हा कोर्स उपलब्ध असून तिथे प्रवेश मिळवण्यासाठी प्रवेश परीक्षा द्यावी लागते.

नोकरीच्या अनेक संधी

बीफार्म आणि डीफार्म केलेल्या विद्यार्थ्यांना सरकारी क्षेत्रात, केमिकल इंडस्ट्रीज, अन्न आणि औषध उत्पादन क्षेत्रात नोकरीच्या संधी मिळतात. याशिवाय स्वत:चे मेडिकल/ फार्मसी स्टोअर सुरू करण्याचा पर्यायही आहे.

फार्मसी स्टोअर सुरू करण्यासाठी स्टेट फार्मसी कौन्सिलकडून लायसन्स मिळवावे लागते. बरेचसे फार्मसी पदवीधर झालेले विद्यार्थी बायोटेक लॅबोरेटरीजमध्ये काम करणे पसंत करतात, तर काही जण फार्मास्युटिकल प्रोडक्ट्सच्या सेल्स आणि मार्केटिंगचे काम करायला प्राधान्य देतात.

फार्मसी क्षेत्रात लागणारे काही गुण आवश्यक आहेत, यात प्रामुख्याने अचूकता, तपशीलवार, वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधन अभिमुखता, विश्लेषणात्मक, दृष्टिकोन प्रामाणिकपणा इत्यादी होय.

(लेखक हे ब्रम्हा व्हॅली ग्रृप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष आहेत.)

Rajaram Pangavane
वाघांची जंगलं पोसण्याची कसरत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com