esakal | Vidhan Sabha 2019 : असे असेल लातूर जिल्ह्यातील 06 मतदारसंघाचे राजकीय चित्र !
sakal

बोलून बातमी शोधा

Vidhan Sabha 2019 Latur district nine constituencies analysis

लातूर जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला आता भाजपचा गड झाला आहे. खासदारकीपासून बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थेवर भाजपचा झेंडा आहे.

Vidhan Sabha 2019 : असे असेल लातूर जिल्ह्यातील 06 मतदारसंघाचे राजकीय चित्र !

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

लातूर जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला आता भाजपचा गड झाला आहे. खासदारकीपासून बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थेवर भाजपचा झेंडा आहे.
त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत या पक्षाकडून इच्छुकांची भाऊगर्दी होती.
यातूनच औसा तसेच अहमदपूर मतदारसंघात बंडखोरी झाली. जिल्ह्यातील सहा
मतदारसंघात ७९ उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यात दुरंगी, तिरंगी एका
ठिकाणी चौरंगी लढत होत आहे.

लातूर शहर विधानसभा मतदारसंघ
लातूर शहर मतदारसंघात सर्वाधिक १९ उमेदवार आहेत. काँग्रेसचे अमित देशमुख यांचे विजयाची हॅटट्रीक करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. तर भाजपने गेल्या निवडणुकीतील उमेदवार शैलेश लाहोटी यांना मैदानात उतरवले आहे. या मतदारसंघात काँग्रेसची मदार ही मागासवर्गीय व मुस्लिम मतावर आहे. पण वंचित बहुजन आघाडीकडून गेली वीस वर्ष नगरसेवक असलेले राजा मणियार यांना रिंगणात उतरवले आहे. ते किती मते घेतात यावर विजयाचे गणित ठरणार आहे.

असे असेल साताऱ्यातील 08 विधानसभा मतदारसंघातील राजकीय चित्र !​

लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ
लातूर ग्रामीण मतदारसंघात १५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. खरे तर हा भाजपचा मतदारसंघ. पण ऐनवेळी शिवसेनेला सोडण्यात आला. त्यामुळे भाजपचे नेते रमेश कराड यांची मेहनत वाया गेली. कोणाचीही ओळख नसलेले सचिन देशमुख यांना शिवसेनेने मैदानात उतरवले आहे. तर काँग्रेसकडून जिल्हा परिषद सदस्य धीरज देशमुख आहेत. येथे एकतर्फीच लढत होत असल्याचे बोलले जात आहे.

जाणून घ्या औरंगाबादमधील 9 मतदारसंघांची राजकीय गणितं !​

औसा विधानसभा मतदारसंघ
औसा मतदारसंघात १४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांच्यामुळे हा मतदारसंघ राज्यात चर्चेत आहे. या मतदारसंघावर शिवसेनेचाही दावा होता. माजी आमदार दिनकर माने यांचे बंड शमवण्यात भाजपला यश आले. पण भाजपचेच जिल्हा परिषदेचे कृषी सभापती बजरंग जाधव यांनी पवार यांच्या विरोधात दंड थोपटून उमेदवारी ठेवली. येथे काँग्रेसच्या वतीने प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील मुरुमकर हे विजयाची हटट्रीकसाठी प्रयत्न करीत आहेत. येथे दुरुंगी लढत होत असली तरी जाधव यांच्या मतावरही विजयाचे गणित
अवलंबून राहणार आहे.

पुणे शहरातील 8 विधानसभा मतदारसंघातील अशी असतील राजकीय गणितं!​

निलंगा विधानसभा मतदारसंघ
निलंगा मतदारसंघात दहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. येथे काँग्रेसचे अशोक पाटील निलंगेकर व भाजपचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर या काका पुतण्यातच लढत होत आहे. आपल्या मुलाला आमदार झाल्याचे पाहण्यासाठी माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर हे प्रयत्न करीत आहेत. तर जिल्हा भाजपमय झाल्याने संभाजी पाटील निलंगेकर यांचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यात केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी निलंगेकर यांना पुन्हा मंत्री करणार असल्याचे जाहिर सांगितल्याने त्यांचे बळ वाढले आहे. येथे दुरुंगी लढत होत आहे.

अशी असतील बीड जिल्ह्यातील 06 मतदारसंघाची राजकीय गणितं !​

अहमदपूर विधानसभा मतदारसंघ
अहमदपूर मतदारसंघात ९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. येथे भाजपमध्येच बंडाळी आहे. विद्यमान आमदार विनायक पाटील हे पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत. त्यांच्याच विरोधात बाजार समितीचे माजी सभापती दिलीप देशमुख हे अपक्ष तर पंचायत समितीच्या सभापती आयोध्या केंद्रे यांनी वंचित बहुजन आघा़डीच्या उमेदवार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबासाहेब पाटील पुन्हा एकदा नशीब अजामवत आहेत. येथे चौरंगी लढत होत आहे.

उदगीर विधानसभा मतदारसंघ
उदगीर राखीव मतदारसंघात १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. येथे भाजपने विद्यमान आमदार सुधाकर भालेराव यांचा पत्ता कट केला. त्यांच्या जागी डॉ. अनिल कांबळे या नवख्या उमेदवाराला संधी दिली. उदगीर तालुक्यातील संस्थावर भाजपचे राज्य आहे. पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, माजी आमदार गोविंद केंद्रे हे त्यांच्यासाठी परिश्रम घेत आहेत. या ठिकाणी राष्ट्रवाादी काँग्रेसचे संजय बनसोडे रिंगणात आहेत. गेल्या पाच वर्षापासून ते मतदारांच्या संपर्कात आहेत. येथे दुरुंगी लढत होत आहे.

loading image
go to top