
5 वर्षाच्या मुलीने वाचविले 3 वर्षाच्या मुलीचे प्राण
मेढा : निझरे ता. जावली येथील तीन वर्षांची लहान मुलगी कु. मनस्वी जोतिराम सापते ही आपल्या घराजवळ खेळत असताना घराच्या बांधकामासाठी ठेवलेल्या पाण्याच्या टाकीत पडली. त्यामुळे घाबरून ती ओरडू लागली. याच वेळी तिथे खेळत असणारी ५ वर्षाची मुलगी कु. ईश्वरी विनोद शेडगे हिने त्या मुलीचा हात धरून तिला पाण्यातून बाहेर ओढून धरले. इतर मुलांनी यावेळी आरडाओरडा करण्यास सुरुवात केल्यामुळे बांधकाम चालू होते तेथिल कामगारांनी टाकीकडे धाव घेत त्या मुलीला टाकीतून बाहेर काढले. कु.ईश्वरी हिने दाखवलेल्या प्रसंगावधनामुळे मनस्वीचे प्राण वाचले. ईश्वरीच्या या धाडसी कामगिरीबद्दल शाळा व्यवस्थापन कमिटी सह, शिक्षक व निझरे ग्रामस्थांनी तिने दाखवलेल्या धाडसाबद्दल कौतुक केले आहे. तसेच निझरेतील ग्रामस्थ जोतिराम पवार यांनी ईश्वरीला बक्षीस देऊन विशेष कौतुक केले आहे.
हेही वाचा: ओमिक्रॉनच नव्हे इतर सर्व व्हेरियंटवर अँटीबॉडीज प्रभावी - ICMR
सध्या अनेक ठिकाणी बांधकामाची कामे बऱ्याच ठिकाणी सुरू आहेत. त्यामुळे याच्या पायासाठी अनेक ठिकाणी खड्डे खणलेले असतात. तसेच पाण्याच्या टाक्या जमिनीवर ठेवलेले असतात. लहान मुले खेळण्याच्या नादात खड्ड्यात किंवा टाकीत पडू शकतात. किंवा घरासाठी लागणाऱ्या साहित्याजवळ खेळत असताना विटा, लोखंड यासारखे साहित्य अंगावर पडू शकते. त्यामुळे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी त्या मालकांनी तसेच बांधकाम करणाऱ्या कामगारांनी कामाबरोबरच कामाच्या आसपास मुले खेळत असतील तर त्यांच्यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.किंवा साहित्याची साठवण करताना अपघात घडणार नाहीत याची दक्षता घेतली पाहिजे.
हेही वाचा: Pfizer, AstraZeneca लस डेल्टा व्हेरियंटवर कमी प्रभावी; नवा निष्कर्ष
निझरे गावात घराचे बांधकाम सुरू होते. त्यावेळी वापरासाठी लागणारे पाणी एका टाकीत साठवले होते. त्यावेळी खेळत असताना मनस्वी त्या टाकीत पडली. मात्र ईश्वरीने दाखवलेल्या साहसामुळे ही घटना इतरांना समजली व मनस्वी ला पाण्यातून बाहेर काढले गेले. ईश्वराने दाखवलेले धाडस सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
संजय धनावडे, शिक्षक
प्राथ. शाळा निझरे
Web Title: 5 Year Old Girl Saves 3 Year Old Girl In Nizre Village At Satarab Districts
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..