सातारा मेडिकल कॉलेजात आजपासून प्रवेश

मार्चमध्ये प्रारंभ; १०० विद्यार्थ्यांची पहिली बॅच, बाहेरच्या राज्यातील १५ विद्यार्थी
satara Medical College
satara Medical Collegesakal

सातारा : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये एमबीबीएसच्या पहिल्या वर्षासाठी उद्यापासून (ता. एक फेब्रुवारी) प्रवेश प्रक्रिया सुरू होत आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या वतीने ही प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार असून, यामध्ये ८५ विद्यार्थी महाराष्ट्रातील व बाहेरच्या राज्यातील १५ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. त्यांची गुणवत्तेनुसार यादी लावली जाणार आहे. हे सर्व विद्यार्थी वैद्यकीय प्रवेश परीक्षा उत्तीर्ण असलेले असणार आहेत. त्यामुळे मार्चमध्ये सातारा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार आहे.

satara Medical College
Budget 2022 : पेगॅसिसवर स्वतंत्र चर्चेला वावच नाही - Govt

सातारा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची प्रत्यक्ष इमारत बांधणी पाटबंधारे विभागाकडून वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतर केलेल्या ६० एकर जागेवर होणार आहे. पण, तात्पुरत्या स्वरूपात जिल्हा रुग्णालय आणि एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीत यावर्षी एमबीबीएसची पहिल्या वर्षीची बॅच सुरू केली जाणार आहे. त्यासाठी आयएमसीची तपासणीही पूर्ण होऊन त्यांनी प्रवेश प्रक्रिया घेण्यास हिरवा कंदील दिलेला आहे. त्यानुसार सर्व तयारी झालेली आहे. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी पहिल्या वर्षाची प्रवेश प्रक्रिया मंगळवारपासून होत आहे. त्यामुळे सातारा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कधी सुरू होणार, याबाबतची साताकरांची प्रतीक्षा संपली आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ही ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे. पहिल्या वर्षासाठी १०० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ८५ विद्यार्थी, तर इतर राज्यांतील १५ विद्यार्थी घेतले जाणार आहेत. जे विद्यार्थी वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया पात्र झालेले आहेत, त्यांच्यातूनच या महाविद्यालयासाठी १०० विद्यार्थी निवडले जातील, त्यांची यादी गुणवत्तेनुसार लावली जाणार आहे. तीन फेऱ्यांमध्ये ही प्रवेश प्रक्रिया होणार आहे. त्यासाठी एक ते सात फेब्रुवारी दरम्यान, महाराष्ट्रातील पात्र विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली जाईल. तसेच दोन ते सात फेब्रुवारी या दरम्यान, इतर राज्यांतील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्यामुळे मार्चपासून सातारा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार आहे.

satara Medical College
नवाब मलिकांच्या अडचणी वाढणार? SC आयोगानं दिले 'हे' आदेश

टेंडरद्वारे चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची भरती

सातारा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होत असल्याने यासाठी लागणाऱ्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची भरती करण्याची परवानगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्यवस्थापनास दिली आहे. त्यानुसार बाह्यस्थ संस्थेच्या माध्यमातून टेंडर पद्धतीने ही भरती होणार आहे. यामध्ये पहिल्या वर्षासाठी मंजूर असलेल्या पाच ते सहा प्रकारच्या पदांचा समावेश असेल. त्यासाठी टेंडर काढण्याचे काम या आठवड्यात होणार आहे.

एक फेब्रुवारीपासून मेडिकल कॉलेजची प्रवेश प्रक्रिया सुरू होत आहे. गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांची यादी लावली जाईल. त्यामुळे मार्चमध्ये सातारा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार आहे.

-डॉ. आर. डी. चव्हाण, डीन, सातारा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com