आरक्षणासाठी शेळ्या, मेंढ्या, घोडी घेऊन धनगर समाज रस्त्यावर; पुणे-बंगलोर महामार्ग अडवला, आंदोलक आणि पोलिसांत झटापट

पुणे व सातारा दोन्ही बाजूकडील महामार्ग साडेबारापासून बंद ठेवला आहे.
Dhangar Community on Pune-Bangalore Highway
Dhangar Community on Pune-Bangalore Highwayesakal
Summary

महामार्गावर धनगर समाजानं मोठी घोषणाबाजी केली, तर महामार्गावरच गजीनृत्य सादर केले.

खंडाळा : सकल धनगर समाजाच्या वतीनं (Dhangar Community) आज पुणे-बंगलोर महामार्ग पारगाव-खंडाळा इथं रोखण्यात आला. यावेळी धनगर समाजानं मोठी घोषणाबाजी केली, तर महामार्गावरच गजीनृत्य सादर केले.

Dhangar Community on Pune-Bangalore Highway
Maratha Reservation : घटनादुरुस्तीशिवाय मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही, हे तितकंच खरं; शाहू छत्रपती महाराजांचं मोठं विधान

याप्रसंगी शेळ्या, मेंढ्या व घोडी घेऊन धनगर समाज रस्त्यावर उतरला होता. दरम्यान, पुणे व सातारा दोन्ही बाजूकडील महामार्ग साडेबारापासून बंद ठेवला आहे.

Dhangar Community on Pune-Bangalore Highway
Dhangar Reservation : ..तर महाराष्ट्रातसुद्धा जाट आंदोलनासारखं धनगर समाजाचं आंदोलन उभा होईल; पडळकरांचा सरकारलाच इशारा

यावेळी पोलिसांनी सातारा बाजूकडील वाहने पंढरपूर फाटा शिरवळ येथे, तर पुण्याकडे जाणारी वाहने वेळे (ता. वाई) येथे अडविण्यात आले आहेत. साताऱ्याकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी आपली वाहने लोणंद बाजूकडून वळविल्याने आंदोलकांनी तीव्र संताप व्यक्त केला.

Pune-Bangalore Highway
Pune-Bangalore Highwayesakal
Dhangar Community on Pune-Bangalore Highway
Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत संभाजीराजेंचं मोठं विधान; म्हणाले, 'मागासलेपण सिद्ध झाल्याशिवाय पुढं..'

याप्रसंगी पोलीस उपविभागीय राहूल धस, तहसीलदार अजित पाटील, शिरवळ-खंडाळा पोलीस निरीक्षक व पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान, तहसीलदार कार्यालय इथं एकत्र जमून यशवंतराव चव्हाण व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकास अभिवादन करून हा मोर्चा पायी चालत महामार्गावर पोहचला. यावेळी धनगर बांधव मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते.

Dhangar Community on Pune-Bangalore Highway
Kolhapur Politics : जे चांगलं आहे, त्याला निश्‍चित पाठिंबा दिला जाईल पण..; राजाराम कारखान्याबाबत काय म्हणाले सतेज पाटील?

दरम्यान, महामार्ग अडविल्यानंतरही गाड्या पुण्याकडे सुरु झाल्यानंतर आंदोलकांनी महामार्गावर धिंगाणा घातला. यानंतर पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली. डीवायएसपी यांनी यात लक्ष घातल्यामुळे आंदोलक शांत झाले आणि यानंतर पुण्याकडे वाहतूक सुरु केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com